Agriculture News in Marathi The whole of Jambha village Make a rehabilitation proposal | Agrowon

जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा : बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पात येणाऱ्या जांभा बुद्रूक या गावाच्या पुनर्वसनासाठी शंभर टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पात येणाऱ्या जांभा बुद्रूक या गावाच्या पुनर्वसनासाठी शंभर टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

कडू यांनी नुकतीच जांभा बुद्रूक पुनर्वसित (काटेपूर्णा बॅरेज) या गावाला भेट देऊन पाहणी केली व येथील पुनर्वसन कामाचा आढावा घेतला. या वेळी आयोजित आढावा बैठकीस गावच्या सरपंच अरुणा इंगळे, माजी आमदार तुकाराम बिडकर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी मूळ प्रकल्प आराखड्यानुसार गावातील ६१ कुटुंबांचे पुनर्वसन सुरू आहे. तथापि, गावाला वेढा घालून वाहणाऱ्या नदी ही पावसाळ्यात पुरामुळे पाणी वाढते व गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक दिवस गावाबाहेर जाता येत नाही, शिवाय गावातील शेती व अन्य व्यवहारांवरही परिणाम होतो. परिणामी गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. 

पालकमंत्र्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, ‘‘या गावातील भौगोलिक रचनेनुसार गावाचे पुनर्वसन करण्याबाबत पुन्हा सर्वेक्षण करावे. हे गाव शंभर टक्के पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवावा.’’


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...