Agriculture news in marathi Wholesale of watermelon at a very low rate | Agrowon

अंकुशनगरला टरबूजाची ठोक विक्रीही कवडीमोल दराने

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

अंकुशनगर, जि. जालना ः यंदा टरबूजाला मिळत असलेल्या ठोक विक्रीतील कवडीमोल दरामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते आहे.

अंकुशनगर, जि. जालना ः यंदा टरबूजाला मिळत असलेल्या ठोक विक्रीतील कवडीमोल दरामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते आहे.

शेतकरी महेश मांगदरे हे दरवर्षी ३ एकर टरबूज पीक घेतात. त्यांना आतापर्यंत एकरी २५ हजार रुपये खर्च येतो व उत्पन्न एकरी सव्वा लाख रुपये येत होते. तीन एकरांत  ६० टन उत्पन्न होत होते व भाव ७ ते ८ रुपये लागत होता. त्यांना ३ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न होत होते. यात निव्वळ नफा हा ३ लाख राहत होता. 

श्री. मांगदरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टरबूज पीक घेतले. प्रत्येक वर्षी टरबुजाला किलोला ९ ते १० रुपये भाव मिळत असतांना ‘कोरोना’च्या प्रकोपात व्यापारी बाजार पेठ बंद व संचार बंदी असल्याने यंदा टरबूजाला किलोला साडे तीन रुपये भाव मिळाला. 

त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरी पणामुळे अवकाळी पाऊस झाल्यानेही यंदा थोड्या फार प्रमाणात उत्पन्न ही घटले असून भाव ही कमी लागला. त्यामुळे फक्त टरबूज लागवड व मेहनतीचा खर्च निघाला आहे. शिवाय व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी करून तेच टरबूज चढ्या भावाने विकत असल्याची स्थिती असल्याचे ते म्हणाले.

गेल्या चार पाच वर्षांपासून टरबूज पीक घेतो. मात्र, यावर्षी सारखा फटका मला कधीच बसला नाही. ‘कोरोना’मुळे हा फटका बसला असून कवडीमोल भावाने व्यापाऱ्याला टरबूज दिले. फक्त मेहनत हाती लागली. फायदा मात्र शून्य. एका एकरात उत्पन्न यंदा तीन एकरात झाले. 
- महेश मांगदरे, शेतकरी, वडीगोद्री, जि. जालना


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...