agriculture news in Marathi why protection on HTBT in Gujrat Maharashtra | Agrowon

गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला संरक्षण का ः जावंधिया

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

 बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील) तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यायचे असल्यास यापुढे ते संकरित ऐवजी केवळ सरळ वाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा.

नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील) तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यायचे असल्यास यापुढे ते संकरित ऐवजी केवळ सरळ वाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा. अथवा गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनावर नियंत्रण मिळवीत दोषींवर कारवाईचे धाडस दाखवावे, अशी मागणी शेती प्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे.

जनुकीय परावर्तित तंत्रज्ञान (जीएम) पिकांना परवानगीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. केंद्र सरकारने सद्यःस्थितीत बीटी कापूस बियाण्यांना परवानगी दिली आहे. त्यानंतर देशात ९५ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड होते.

शेतकऱ्यांना दिलासा देत तंत्रज्ञानाचा प्रभाव कमी झाल्याच्या कारणाआड बीटीवरील रॉयल्टी रद्द करण्यात आली. परंतु त्यानंतरही बीटी पाकिटाचे दर ७३० रुपये कायम ठेवण्यात आले. बीटी बियाणे संकरित स्वरुपातच विकल्या जाते. त्याऐवजी सरळ वाणात हे तंत्रज्ञान टाकल्यास बियाणे दर नियंत्रणात आणण्यसोबतच दरवर्षी विकत घेण्याची गरजही शेतकऱ्यांना पडणार नाही. 

२०१५ मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चे दरम्यान त्यांनी सरळ वाणात बीटी तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले होते. परंतु आजवर त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. बायर-मोन्सॅटो कंपनी तणाला प्रतिकारक कापूस वाण बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्याच कंपनीचे राऊंडअप तणनाशक वापरण्याला प्रोत्साहन मिळेल. परंतु केंद्र सरकारने अद्याप एचटीबीटीला मान्यता दिलेली नाही. परिणामी या तंत्रज्ञानावरील बियाणे वापर देशात गैरकायदेशीर आहे.

परंतु याचे उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याची माहिती आहे. तेथूनच महाराष्ट्रात या अवैध बियाण्यांचा पुरवठा होतो. या ठिकाणी काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुजरातमध्ये मात्र याचे खुलेआम उत्पादन होत असताना आणि त्यात काही बड्या बियाणे कंपन्यांचा हात असताना त्याबाबत गुजरात सरकार अनभिज्ञ कसे? कारण संकरित बियाणे उत्पादन आणि त्यात जनुकाचा अंतर्भाव करणे ही तांत्रिक प्रक्रिया आहे. शेतकरी ही प्रक्रिया करुच शकत नाही. मग गुजरात सरकार अशाप्रकारच्या गैरकृत्यावर निर्बंध का घालत 
नाही.

बियाणे कंपन्यांची दुकानदारी
अमेरिकेत संकरित कापूस वाणांचा उपयोग होत नाही. तेथे दहा पाऊंड (पाच किलो) बियाणे एकरी वापरतात. ३० ते ३५ हजार झाडे एकरात राहतात. पूर्वी पाच किलो सरकी आपल्या देशातही वापरली जात होती. त्यामुळे देशात कोणतेही तंत्रज्ञान सरळ वाणातच असले पाहिजे. मात्र बियाणे कंपन्यांची दुकानदारी चालावी याकरिता ते होऊ दिले जात नाही.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...