जीएम औषधांवर बंदी का नाही?

काही विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल, तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्य‍ा वापरा‍वर बंदी का नाही?
Why is there no ban on GM drugs?
Why is there no ban on GM drugs?

कापडणे, जि. धुळे : काही विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल, तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्य‍ा वापरा‍वर बंदी का नाही, असा सवाल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष शांतूभाई पटेल, उत्तर महाराष्ट्रप्रमुख शशिकांत भदाणे, माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी यांनी उपस्थित केला आहे. 

संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सुरू असलेल्य‍ा बीटी वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. काही पर्यावरणवादी, विकासविरोधी संघटनांचा आग्रह व पाच राज्यांनी चाचण्य‍ा घेण्याबाबत दाखविलेल्या प्रतिकूलतेमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व राज्य सरकारांना निवेदने ‍पाठवून बीटी वांग्याच्या चाचण्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊ नये, असा आग्रह धरला होता. बीटी वांगे खाण्यास निर्धोक आहेत. प्राणी, पर्यावरण व जमिनीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असा निर्वाळा दिला आहे. आयसीएआर या संस्थेनेसुद्धा जीएम पिकामुळे कोणताही धोका नाही, असे स्पष्ट केलेले असताना पर्यावरणमंत्र्यांनी असा निर्णय घेणे, हे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचा आरोप केला आहे. 

शेतीसाठी जनुक तंत्रज्ञान (जीएम) वापरण्यास विरोध करणारे औषधी क्षेत्रात होणाऱ्या वापराबद्दल काहीही तक्रार करत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली लस किंवा सर्वच लसी याच जीएम तंत्राचा वापर करून तयार होतात. मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तींना दिले जाणारे इन्शुलिन, कॅन्सरसाठीची औषधे, लहान मुलांमधील स्थूलपणा रोखण्यासाठीची औषधे जीएम तंत्राचा वापर करूनच तयार होतात. या क्षेत्रात जर हे तंत्रज्ञान स्वीकारले जात असेल तर शेती क्षेत्रात का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. 

...आता शेतकरीच चाचण्या घेत आहेत  शासनाने कितीही बंदी घातली तरी शेती क्षेत्रात जीएम तंत्राज्ञानाचा प्रसार करण्यापासून रोखू शकत नाही. बंदी असली तरी लाखो हेक्टरमध्ये तणनाशक रोधक कपाशीची लागवड होत आहे. हजारो हेक्टर बीटी वांग्याचीसुद्धा लागवड झालेली आहे. सरकारच्या परवानगीची शेतकऱ्यांना गरज नाही. शासनाने चाचण्या करण्यापेक्षा शेतकरीच चाचण्या घेत आहेत. थोड्याच कालावधीत कपाशी व वांग्याबरोबरच मका, सोयाबीन, पपई आदी पिकांच्या जीएम वाणांची लागवड देशभर होणार असल्याचा विश्‍वास पत्रकात व्यक्त केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com