Agriculture news in marathi Why is there no ban on GM drugs? | Page 2 ||| Agrowon

जीएम औषधांवर बंदी का नाही?

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

काही विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल, तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्य‍ा वापरा‍वर बंदी का नाही?

कापडणे, जि. धुळे : काही विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल, तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्य‍ा वापरा‍वर बंदी का नाही, असा सवाल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष शांतूभाई पटेल, उत्तर महाराष्ट्रप्रमुख शशिकांत भदाणे, माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी यांनी उपस्थित केला आहे. 

संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सुरू असलेल्य‍ा बीटी वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. काही पर्यावरणवादी, विकासविरोधी संघटनांचा आग्रह व पाच राज्यांनी चाचण्य‍ा घेण्याबाबत दाखविलेल्या प्रतिकूलतेमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व राज्य सरकारांना निवेदने ‍पाठवून बीटी वांग्याच्या चाचण्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊ नये, असा आग्रह धरला होता. बीटी वांगे खाण्यास निर्धोक आहेत. प्राणी, पर्यावरण व जमिनीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असा निर्वाळा दिला आहे. आयसीएआर या संस्थेनेसुद्धा जीएम पिकामुळे कोणताही धोका नाही, असे स्पष्ट केलेले असताना पर्यावरणमंत्र्यांनी असा निर्णय घेणे, हे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचा आरोप केला आहे. 

शेतीसाठी जनुक तंत्रज्ञान (जीएम) वापरण्यास विरोध करणारे औषधी क्षेत्रात होणाऱ्या वापराबद्दल काहीही तक्रार करत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली लस किंवा सर्वच लसी याच जीएम तंत्राचा वापर करून तयार होतात. मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तींना दिले जाणारे इन्शुलिन, कॅन्सरसाठीची औषधे, लहान मुलांमधील स्थूलपणा रोखण्यासाठीची औषधे जीएम तंत्राचा वापर करूनच तयार होतात. या क्षेत्रात जर हे तंत्रज्ञान स्वीकारले जात असेल तर शेती क्षेत्रात का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. 

...आता शेतकरीच चाचण्या घेत आहेत 
शासनाने कितीही बंदी घातली तरी शेती क्षेत्रात जीएम तंत्राज्ञानाचा प्रसार करण्यापासून रोखू शकत नाही. बंदी असली तरी लाखो हेक्टरमध्ये तणनाशक रोधक कपाशीची लागवड होत आहे. हजारो हेक्टर बीटी वांग्याचीसुद्धा लागवड झालेली आहे. सरकारच्या परवानगीची शेतकऱ्यांना गरज नाही. शासनाने चाचण्या करण्यापेक्षा शेतकरीच चाचण्या घेत आहेत. थोड्याच कालावधीत कपाशी व वांग्याबरोबरच मका, सोयाबीन, पपई आदी पिकांच्या जीएम वाणांची लागवड देशभर होणार असल्याचा विश्‍वास पत्रकात व्यक्त केला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...