agriculture news in Marathi wild vegetable has importance in agriculture tourism Maharashtra | Agrowon

कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्व

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्त्व आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक तरुणांना असणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्त्व आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक तरुणांना असणे गरजेचे आहे. पर्यटकांना रानभाज्या आणि त्याचे औषधी गुणधर्म ज्ञात होण्यासाठी त्यासंदर्भातील साहित्य वेंगुर्ला फळसंशोधन केंद्रात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत यांनी येथे व्यक्त केले.

डॉ. बाळकृष्ण गावडे आणि डॉ. निलेश कोदे यांनी लिहिलेल्या रानभाज्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन स्नेहसिंधु कृषी पदवीधर शिक्षक संस्थेच्यावतीने आयोजीत करण्यात आले होते. झुम ॲपच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला दापोली कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, राज्य मराठी विकास संस्थेचे संजय पाटील, विभागीय सहसंचालक विकास पाटील, स्नेहसिंधुचे हेमंत सावंत, संदीप राणे, व्ही.के.सावंत, डॉ.संजय माने, यासह कृषिक्षेत्रातील विविध तज्ज्ञ उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. सावंत म्हणाले, की कोकणातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आहेत. परंतु त्याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे ही माहिती स्थानिक तरुणांना असणे आवश्यक आहे. कृषी पर्यटनासाठी रानभाज्यांचा प्रसार होणे आवश्यक आहे. पर्यटकांना या भागात कुठे आणि कोणत्या रानभाज्या मिळतात याची माहिती मिळणे गरजेचे आहे. याशिवाय पर्यटकांना रानभाज्यांचे पदार्थही उपलब्ध होणे गरजेचे आहेत. त्यासाठी वेंगर्ले संशोधन केंद्रात लवकरच त्यासंदर्भातील साहित्य ठेवण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून रानभाज्यांची शास्त्रीय माहिती आणि शिजविण्याची पांरपरिक पद्धत त्याचे औषधी गुणधर्म माहिती होणार आहेत.

डॉ. संजय भावे म्हणाले, की आदिवासी लोकांचे संपूर्ण जीवनच रानभाज्यांवर अवलंबून आहे. औषध, अन्न आणि जगण्याचे साधनच रानभाज्या आहेत. आपल्या नेहमीच्या जगण्यात रानभाज्यांना खूप मोठे स्थान आहे. या भाज्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून स्नेहसिंधुने पुढाकार घेऊन मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणालगत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन ठिकाणी रानभाज्यांचे डेमोस्टेशन करावे.
विभागीय सहसंचालक विकास पाटील यांनी ‘‘रानभाज्यांचे आहारातील महत्व, औषधी गुणधर्म हे लोकांना समजणे गरजेचे आहे. रानभाज्यांच्या बियाण्यांची बँक निर्माण करता येते का? याचा विचार सुध्दा व्हावा’’, असे त्यांनी स्पष्ट केले.

संकेतस्थळावरही मिळणार रानभाज्यांची माहिती
रानभाज्यांचे पुस्तक प्रकाशीत करण्यासाठी राज्य मराठी विकास परिषदेने सहकार्य केले आहे. परंतु सध्याचे युग हे संगणकीय इंटरनेटचे आहे. त्यामुळे रानभाज्यांचे हे पुस्तक मराठी भाषा परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया
रानभाज्या या पुस्तकात एकुण ३५० रानभाज्यांचा समावेश आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव, मराठी उच्चारण, स्थानिक नाव, संस्कृत नाव, त्या वनस्पतीच्या फुलांचे, फळाचे फोटो आणि वर्णन, पौष्टिक घटक टिकून राहण्यासाठी पारंपरिक पाककृती याची मांडणी केलेली आहे. 
- डॉ. बाळकृष्ण गावडे, लेखक, रानभाज्या पुस्तक


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...