agriculture news in marathi Will agitate with rice flour` | Agrowon

`भाताच्या पेंड्यासह आंदोलन करणार`

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

सिंधुदुर्ग : ‘नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत करण्यात आले नाहीत, तर कुजलेल्या भाताच्या पेंड्या घेऊन जिल्हाधिकारी आणि कृषी कार्यालयासमोर आंदोलन छेडू.’

सिंधुदुर्ग : ‘परतीच्या पावसाने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत करण्यात आले नाहीत, तर कुजलेल्या भाताच्या पेंड्या घेऊन जिल्हाधिकारी आणि कृषी कार्यालयासमोर आंदोलन छेडू’, असा इशारा जिल्हा परिषद सदस्यांनी सभेत दिला.

जिल्हा परिषद कृषी समितीची सभा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. म्हेत्रे, सदस्य रणजित देसाई, महेंद्र चव्हाण, सुधीर नकाशे, संजय देसाई, गणेश राणे, प्रीतेश राऊळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. सखल भागातील भातशेती तर पूर्णतः कुजली आहे. कापलेल्या भाताला कोंब फुटले आहेत. परंतु, तरीही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात नाहीत, ही गंभीर बाब आहे, असा मुद्दा सदस्य रणजित देसाई यांनी उपस्थित केला. जिल्हा कृषी अधीक्षक म्हेत्रे यांना लक्ष्य केले. कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले का? असा प्रश्न कृषी अधीक्षकांना विचारला.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुकास्तरावर पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, असे त्यांनी सांगितले. यावरून सभेतील वातावरण अधिकच तापले. सर्वच सदस्यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

आजमितीस कुठल्याही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. येत्या दोन दिवसांत पंचनामे झाले नाही, तर जिल्हाधिकारी आणि कृषी कार्यालयावर कुजलेल्या पेंड्या घेऊन आंदोलन करू, असा इशारा सदस्यांनी दिला.

नकाशे यांनी गेल्यावर्षी नाचणी, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले होते. परंतु, या पिकांना भरपाई देण्यात आली नव्हती, असे स्पष्ट केले. त्यामुळे ज्या पिकांचे नुकसान होईल, त्या पिकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या विधेयकाचा स्वीकार राज्य सरकारने करावा, असा ठराव करण्यात आला.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...