Agriculture news in Marathi Will agitate by wearing PPE kit for Usbila | Page 2 ||| Agrowon

ऊसबिलासाठी पीपीई किट घालून आंदोलन करणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

शेतकऱ्यांची देणी अदा करावीत. अन्यथा, प्रत्येक कारखान्याच्या गेटसमोर पीपीई किट घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ऊर्फ सोनू साबळे यांनी दिला.

सातारा : कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिल अदा करणे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कोरोनाचा आसरा घेऊन तब्बल चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना देणी दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, कारखान्यांनी येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांची देणी अदा करावीत. अन्यथा, प्रत्येक कारखान्याच्या गेटसमोर पीपीई किट घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ऊर्फ सोनू साबळे यांनी दिला.

जिल्ह्यातील किसन वीर, शरयू, जरंडेश्‍वर, स्वराज यांसह अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना ऊस पिकाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन नाही. लागवडीसाठी काढलेले कर्ज, तसेच कामगार व उदरनिर्वाह करण्यासाठी बॅंका व इतर माध्यमातून कर्जे काढावी लागली. त्या कर्जांची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांमागे तगादा सुरू आहे, असे असताना ज्या कारखान्यांना ऊस घालूनही चार महिन्यांपासून बिले जमा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

आता परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली यंत्रणा चिरीमिरी मिळत असल्याने गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार असून, त्यादृष्टीने आता दोन दिवसांत कारखान्यांनी देणी अदा करावीत. अन्यथा, कोरोनाचे सर्व नियम पाळून व कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई किट घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री. साबळे यांनी दिला आहे.

 


इतर बातम्या
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...