अकोला जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी होणार?

Will Akola Zilla Parishad Mahavikas aghadi?
Will Akola Zilla Parishad Mahavikas aghadi?

अकोला : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढण्याबाबत सकारात्मक झाले आहेत. मात्र, सर्कलनिहाय जागांचा तोडगा सोडविला गेला तरच आघाडी एकत्र लढण्याचे स्पष्ट होईल.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. या जिल्हा परिषदेवर बहुतांश पंचायत समित्यांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी पूर्वाश्रमीच्या भारीप बमसं चे वर्चस्व आहे.  सर्व जाती-पोटजातींना नेतृत्व देत आंबेडकर यांनी जातीय समिकरणे आजवर व्यवस्थित हाताळली आहेत. 

जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच जोरदार तयारी सुरू केली. दरम्यान, राज्यात आकाराला आलेल्या महाविकास आघाडीकडून ही निवडणूक कशी लढविली जाते? याची उत्सुकता होती. सुरुवातीला या पक्षांचे नेते स्वबळाची भाषा करीत तयारीलाही लागले. प्रत्येकाने आपापल्या पक्षातील निवडणुकीसाठी उत्सुकांच्या मुलाखती घेतल्या.  बहुजन वंचित आघाडीला, भाजपला सक्षमपणे लढा देण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम पर्याय ठरू शकतो. मात्र, तिघांनीही एकत्र येण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वी या पक्षांच्या अध्यक्षांनी बैठक घेत चर्चेची एक फेरी पूर्ण केली. एकत्र लढण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. यावर अंतिम निर्णय मात्र, नागपुरात होत असलेल्या अधिवेशन काळात घेतला जाईल, असे संकेत देण्यात आले.  सर्कलनिहाय काही ठिकाणी जागांचा तोडगा काढण्यावरून शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचे तूर्त घोडे अडले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मित्र पक्षांशी आघाडी करण्याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अनुकूल असल्याचे प्रदेश पातळीवरूनही जाहीर करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेने तयारी केली असली, तरी अकोला, पातूर आणि बाळापूर येथील सर्व सर्कल व उर्वरित चार तालुक्यात तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाबाबत शिवसेना आग्रही असल्याचे वृत्त आहे. ५३ पैकी एकट्या शिवसेनेला इतक्या जागा कशा द्यायच्या? हा खरा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com