मार्चअखेर जाहीर होणार  तुरीची अंतिम उत्पादकता 

तुरीच्या पिकाचा २०२१-२२ या वर्षीचा जिल्हानिहाय उत्पादकतेचा जाहीर झालेला तपशील प्रथम पूर्वानुमान अंदाजावर आधारित आहे.
Will be announced by the end of March The final productivity of the trumpet
Will be announced by the end of March The final productivity of the trumpet

परभणी ः तुरीच्या पिकाचा २०२१-२२ या वर्षीचा जिल्हानिहाय उत्पादकतेचा जाहीर झालेला तपशील प्रथम पूर्वानुमान अंदाजावर आधारित आहे. तो नजरअंदाजित आहे. तुरीच्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी सादर करण्यास ३१ मार्च २०२२ ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर उत्पादकता आकडेवारी निश्‍चित होईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली.  कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार २०२०-२१मधील अंतिम पूर्वानुमान अंदाजावर आधारित राज्याची तुरीची प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता १०.८२ क्विंटल आहे. तर २०२१-२२ मधील प्रथम पूर्वानुमान अंदाजानुसार राज्याची तुरीची प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता ८.१८ क्विंटल आहे.  यंदाच्या (२०२१-२२) हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने तूर खरेदीसाठी डिसेंबर (२०२१) मध्ये कृषी विभागाच्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार तुरीची उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षी (२०२०-२१) जानेवारी (२०२१) मध्ये कृषी विभागाच्या द्वितीय आगाऊ अंदाजानुसार उत्पादकता जाहीर करण्यात आली होती. कृषी विभागाने निश्‍चित केलेल्या प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या अंदाजानुसारच हमीभाव खरेदी केंद्रांवर तूर किंवा अन्य शेतमालाची खरेदी केली जाते, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले. 

कृषी आयुक्तालयाकडील २०२०-२१ या वर्षाची जिल्हानिहाय अंतिम तूर पीक उत्पादकता (क्विंटल)  ठाणे (६.६२), पालघर (६.६२), रायगड (६.६२), रत्नागिरी (६.६२), सिंधुदुर्ग (६.६२), नाशिक (९.०५), धुळे (६.४३), नंदुरबार (४.८७), जळगाव (८.१२), नगर (७.५८), पुणे (८.२६), सोलापूर (६.१८), सातारा (३.४०), सांगली (५.९४), कोल्हापूर (६.०१),औरंगाबाद (६.९३), जालना (१२.३२), बीड (१४.४०), लातूर (१४.७८), उस्मानाबाद (९.३७), नांदेड (१०.६९), परभणी (१२.८८), हिंगोली (२.८३), बुलडाणा (१५.०२), अकोला (९.३१), वाशीम (८.५४), अमरावती (९.१९), यवतमाळ (५.८१), वर्धा (१८.५५), नागपूर (१५.१७), भंडारा (१४.९४), गोंदिया (१४.९४),चंद्रपूर (१६.२४), गडचिरोली (१४.९४). 

२०२१-२२ मधील प्रथम पूर्वानुमान अंदाजानुसार तूर उत्पादकता (क्विंटल)  ठाणे (५.४८), पालघर (४.४४), रायगड (५.८६), रत्नागिरी (४.१६), सिंधुदुर्ग (४), नाशिक (३.८०), धुळे (१.५०), नंदुरबार (५.२९), जळगाव (७.५०), नगर (५.५०), पुणे (४), सोलापूर (४.८०), सातारा (९.५०), सांगली (६.२९), कोल्हापूर (७), औरंगाबाद (४.९०), जालना (१५), बीड (४.६२), लातूर (१०), उस्मानाबाद (३.४५), नांदेड (६.५०), परभणी (७.), हिंगोली (२.२५), बुलडाणा (८.७०), अकोला (५), वाशीम (७.८०), अमरावती (१०), यवतमाळ (१२.२५), वर्धा (९), नागपूर (१५), भंडारा (५), गोंदिया (६.४७),चंद्रपूर (१४.५०), गडचिरोली (७.६०).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com