agriculture news in Marathi will be focus on agri inputs distribution problems Maharashtra | Agrowon

निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार : शरद पवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास मी स्वतः लक्ष घालेन. या प्रकरणात निविष्ठा विक्रेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा राहील.

पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास मी स्वतः लक्ष घालेन. या प्रकरणात निविष्ठा विक्रेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. 

दिल्लीत निविष्ठा विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्‍स सीड्‍स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपिन कासलीवाल, ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री तसेच आबासाहेब भोकरे, नीलेश धांदर पाटील, विजय गिरनारे, बाळाजी चौगुले, विजय सोनार या वेळी उपस्थित होते. 

निविष्ठा वितरणातील मुद्द्यांचे निवेदन या वेळी श्री. पवार यांना देण्यात आले. ‘‘निविष्ठा वितरणातील अडचणींबाबत संघटनेच्या पातळीवरून संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे पत्रव्यवहार झाल्यास त्यात मी व्यक्तिशः लक्ष देईन,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतराव कराड यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. ‘‘कीटकनाशकांवर सध्या केंद्र शासनाने जास्त जीएसटी ठेवला आहे. त्यात कपात करावी,’’ अशी मागणी मंत्री कराड यांच्याकडे करण्यात आली. ‘‘रेल्वेकडून खतांची वाहतूक करताना येणाऱ्या विविध समस्या सोडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,’’ अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल मंत्री कराड व मंत्री दानवे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 

खासदार सिद्धेश्‍वर स्वामी (सोलापूर) व उन्मेश पाटील (जळगाव) यांनीही निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. विविध मंत्र्यांकडे जाण्यासाठी दोन्ही खासदारांनी शिष्टमंडळाला मदत केली, अशी माहिती ‘माफदा’च्या सूत्रांनी दिली. 
 


इतर अॅग्रो विशेष
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...