राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी करणार
शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार क्विंटल वाढीव मका खरेदी करणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमधून देण्यात आली. अगोदर २० हजार ८८५ क्विंटल मका खरेदी झाली आहे.
नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार क्विंटल वाढीव मका खरेदी करणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमधून देण्यात आली. अगोदर २० हजार ८८५ क्विंटल मका खरेदी झाली आहे.
जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंद्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मक्याची खरेदी करण्यासाठी बारा मका खरेदी केंद्रे सुरू केली होती. मक्याची विक्री करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र, सरकारने ठरवलेल्या उद्दिष्टाएवढी मका खरेदी झाल्याने मका खरेदी केंद्रे बंद झाली होती. अचानक मका खरेदी केंद्रे बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करूनही मक्याची विक्री करता आली नाही.
बाजारात पुरेसा दर नसल्याने राहिलेली मका खरेदी करण्यासाठी मका खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली. लोकप्रतिनिधींनीही याबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे शासनाने वाढीव मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करत मका खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात वाढीव ५० हजार क्विंटल मका खरेदी करणार आहेत.
१६ जानेवारीपासून मका खरेदी सुरू झाली असून ३१ जानेवारीपर्यंत ती सुरू राहणार आहे. मका विक्रीसाठी नव्याने नोंदणी केली जात नसून जुन्याच नोंदणीनुसार मक्याची खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून केले आहे.
- 1 of 1053
- ››