Agriculture news in Marathi, Will the camps in the city be closed after eight days? | Agrowon

नगर जिल्ह्यातील छावण्या आठ दिवसानंतर बंद होणार का?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

नगर ः दोन दिवसांपूर्वी काही भागांत बऱ्यापैकी पाऊस झालेला असला तरी, सध्या चारा उपलब्ध नाही. चारा तयार व्हायला अजून किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान चारा छावण्याची मुदत १ ऑगस्टला म्हणजे आठ दिवसांत संपणार आहे. त्यानंतर छावण्या सुरू राहणार की बंद होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.   

नगर ः दोन दिवसांपूर्वी काही भागांत बऱ्यापैकी पाऊस झालेला असला तरी, सध्या चारा उपलब्ध नाही. चारा तयार व्हायला अजून किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान चारा छावण्याची मुदत १ ऑगस्टला म्हणजे आठ दिवसांत संपणार आहे. त्यानंतर छावण्या सुरू राहणार की बंद होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.   

नगर जिल्ह्यामधील अनेक भागांत अजूनही फारसा जोरदार पाऊस नाही. आताच्या दोन दिवसांत काही भागांत जोराचा पाऊस पडला. मात्र, पाणी साठवण अथवा पाणीपातळी उंचावण्याला अजून मदत झालेली नाही. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या दुष्काळाच्या झळा कायम आहेत. दुष्काळी भागात जनावरे जगवण्यासाठी यंदा फेब्रुवारीपासून जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर जूनच्या मध्यान्हात काही भागांत पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेल्याने जवळपास साडेतीनशे छावण्या बंद झाल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने जनावरे जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी झाली आणि प्रशासनाला पुन्हा काही भागांत छावण्या सुरू कराव्या लागल्या. सध्या जिल्हाभरात २३६ छावण्या सुरू आहेत. जून अखेरीसच छावण्या बंद होणार होत्या. मात्र, पाऊस नसल्याने छावण्याला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. आता गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र अजूनही अनेक भागात पाऊस नाही. जेथे पाऊस पडला तेथे चारा व्हायलाही एक महिन्याचा कालावधी लागणार आहेत. जनावरांच्या छावण्याची १ ऑगस्टला मुदत संपणार आहे. मात्र, अजून चारा तयार व्हायला एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. पूर्वीचा चारा शिल्लक नाही त्यामुळे आठ दिवसांनी छावण्या बंद झाल्या तर जनावरे जगवायची कशी, हा प्रश्न अनेक भागांत कायम आहे. प्रशासनाकडूनही चारा छावण्या सुरू राहणार की बंद होणार याबाबत बोलले जात नाही. छावण्यांना मुदतवाढ देण्याची मागणी सुरूच आहे. 

सुरू असलेल्या छावण्या 
नगर ः ३१, जामखेड ः ३६, पारनेर ः ३१, कर्जत ः ६८, पाथर्डी ः २८, श्रीगोंदा ः २७, शेवगाव ः १२, संगमनेर ः २, 

चार मंडळांत अल्प पाऊस
नगर जिल्ह्यामध्ये ९७ महसूल मंडळांपैकी आत्तापर्यंत चार महसूल मंडळांत अल्प पाऊस झालेला असून, २२ महसूल मंडळांत १०० मिलिमीटरच्या आत, २७ महसूल मंडळांत २०० मिलिमीटरच्या आत, तर ११ महसूल मंडळांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस सहा महसूल मंडळांत असून, अकोले महसूल मंडळात ४९९, तर शेंडी महसूल मंडळात तब्बल १२७४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...
पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या...मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़,...
कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी...रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...