Agriculture news in Marathi will continue CM food processing scheme: Agriculture Minister Bhuse | Page 2 ||| Agrowon

मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच ठेवणार ः कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी शासन आणखी चार ते पाच वर्षे मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना राबवणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली.

पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी शासन आणखी चार ते पाच वर्षे मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना राबवणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली.

पुणे जिल्ह्याअंतर्गत हवेली तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कोरोना संसर्गापासून संरक्षणासाठी कृषीमित्र व शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे व खते पुरवठा करण्याच्या उपक्रमास पेरणे (ता. हवेली) येथून गुरूवारी (ता.२८) सुरुवात करण्यात आली.

पुणे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकुर, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, हवेलीचे माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर वाळके, डोंगरगावचे सरपंच विक्रम गायकवाड तसेच वाघोली मंडल कृषी अधिकारी सत्यजित शितोळे, लोणीकंद येथील शेती विकास शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष किसन कंद भैरवनाथ कृषी विकास शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष गोरक्ष गोते आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले की, शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शेतमालाची योग्य साठवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी शीतगृहे, तसेच त्यांवर प्रक्रिया उद्योग उभे करणे, ही संपूर्ण साखळी मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेच्या अंतर्गत उभी केली जात आहे. गटशेती व फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांचे बळकटीकरण करण्यांसाठी मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना आणखी चार ते पाच वर्षे राबविण्यात येणार आहे.

तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी शेतकऱ्यांना खत दुकानात न येता शेतकरी गटांमार्फत थेट शेताच्या बांधावरच खते व निविष्ठा यांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी गटांना युरिया, १०:२६:२६, १५:१५:१५ व २४:२४:० अशा प्रकारची खते वितरित करण्यात येत आहेत.


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...