agriculture news in marathi Will continue until Saturday Buy maize, sorghum | Page 2 ||| Agrowon

शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची खरेदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला शनिवारपर्यंत (ता. ३१) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र मका, ज्वारी खरेदी न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाने मका विकण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.

औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला शनिवारपर्यंत (ता. ३१) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र मका, ज्वारी खरेदी न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाने मका विकण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.

राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईतर्फे हमीभाव खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य मका व ज्वारी खरेदीची मर्यादा व मुदत वाढवून देण्याबाबत केंद्र शासनाला विनंती केली होती. त्यानुसार मका व ज्वारी खरेदीसाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिवाय ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्‍विंटलपर्यंत वाढवून देण्यात आले आहे. केंद्र शासनाने यापूर्वी मंजूर केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या ज्वारी खरेदीला वित्त विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मका व ज्वारी खरेदीसाठी यापूर्वी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय नोंदणी करूनही मका व ज्वारी खरेदी होऊ शकली नाही, अशा शेतकऱ्यांचा शेतमाल 
खरेदीची प्रक्रिया यापूर्वी दिलेल्या उद्दिष्टाच्या मर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी २४९५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे संदेश पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६५ शेतकऱ्यांचा ४०६० क्‍विंटल ५० किलो मका खरेदी करण्यात आला. २३३० शेतकऱ्यांना खरेदीचे संदेश पाठविले. परंतू त्यांचा मका खरेदी झाला नव्हता.

मका खरेदीचा कालावधी पूर्ण झाल्याने ती बंद करण्यात आली होती. आता मुदतवाढ मिळाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्वी झाली व ज्यांना खरेदीसाठीचे एसएमएस आले, पण खरेदी होऊ शकली नाही, त्यांना या मुदतवाढीत आपला मका आधारभूत किमतीने खरेदीसाठी आणता येईल.
- एस. के. पांडव, जिल्हा पणन अधिकारी, औरंगाबाद.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...