डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू शेट्टी

डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू शेट्टी
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू शेट्टी

पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून परवाना वाटप करताना कृषी उद्योजकांचा होणारा आर्थिक छळ अजिबात सहन केला जाणार नाही. त्यासाठी डिजिटल सिग्नेचरसह परवाना देण्याच्या मागणीसाठी लढा देण्याची आमची तयारी आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.   राज्यात हजारो कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगाला विविध परवाने कृषी आयुक्तालयाकडून ऑफलाइन पद्धतीने का दिले जातात, गुणनियंत्रण विभागाच्या कामकाजात गंभीर स्वरूपाची अनियमितता असूनही दुर्लक्ष का केले जाते. या आर्थिक भानगडींचा परिणाम परिणाम थेट या राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणात होतो. सरकारला हे दिसत नाही का, असे संतप्त सवाल खा. शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत.  स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. १२) आक्रमक आंदोलन केल्यानंतर अनेकांचे दोन दोन वर्षे रखडलेले परवाने देण्यात आले. भाजप सरकारने सगळीकडे पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. मात्र कृषी आयुक्त कार्यालयाच्या लेखी ही गोष्ट नसल्याचे पुढे आले आहे, असेही ते म्हणाले.  गुणनियंत्रण विभागातील परवाने देण्याची संपूर्ण पद्धत डिजिटल सिग्नेचरसहित परवाना प्रिंट मिळण्यात रूपांतरित करावी, अशी स्वाभिमानीची मागणी आहे. तशा आशयाचे पत्रही आम्ही कृषिसचिवांना दिले आहे. शेतकरी उद्योजकांना नाडणारी ही व्यवस्था बंद होऊन डिजिटल सिग्नेचरसह परवाना ही प्रक्रिया लागू होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी हे आंदोलन सोडणार नाही, असे स्वाभिमानी पक्षाच्या मुख्यालयातून सांगण्यात आले.  खा. शेट्टी स्वतः वेळोवेळी या प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे विहित नमुन्यात आणि योग्य कागदपत्रांसह अर्ज करूनही परवाना मिळण्यात अडचणी येणाऱ्या शेतकरी उद्योजकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे मांडव्यात. या तक्रारींची दखल घेऊन आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.  संपर्क साधण्याचे आवाहन : खा. शेट्टी यांच्या rajushetti@gmail.com आणि रविकांत तुपकर यांच्या ravikanttupkar.१@gmail.com या ई-मेलवर मत मांडावे, तसेच स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्याशी ८८०५७९३३३३ या क्रमांकावर संपर्क साधून उद्योजकांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com