कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा करू: शरद पवार

कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात विचार करावा लागेल. यासाठी आजच संबंधित खात्याशी संपर्क साधून उद्या किंवा परवा त्यांच्या वेळेप्रमाणे माझी चर्चेची तयारी आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar

नाशिक: कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात विचार करावा लागेल. यासाठी आजच संबंधित खात्याशी संपर्क साधून उद्या किंवा परवा त्यांच्या वेळेप्रमाणे माझी चर्चेची तयारी आहे. शेतकरी, व्यापारी प्रतिनिधींना सोबत घेऊन निर्णय घेणाऱ्या यंत्रणेसमोर तुमचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी आग्रह करणार आहे, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बुधवारी (ता.२८) शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक, व्यापारी व शेतकरी संघटना प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जेष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी उपस्थित होते.  खासदार शरद पवार म्हणाले, की कांद्यासंदर्भात निर्यातबंदी, आयात,साठवणूक मर्यादा असे निर्णय घेतले जातात. यासंबंधी एक धोरण ठरवावे, हे धोरण उत्पादक आणि व्यापार यांच्या हिताची जपणूक करणारे असले पाहिजे, असा आग्रह या भेटीत केंद्राकडे करणार आहे.  ‘‘कांद्यासंबंधी सर्व धोरणे केंद्राच्या हाती आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. निर्यातीबाबत देश पातळीवर निर्णय असून केंद्र सरकारशी याबाबत चर्चा करावी लागेल. कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होणे ही बाब योग्य नाही. यावर व्यापाऱ्यांनी तोडगा काढावा. बाजारातील चढ-उताराची झळ कांद्याला बसली आहे,’’ असेही खासदार शरद पवार म्हणाले.  यावेळी संघर्ष शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले, कांदा उत्पादक राजेंद्र भामरे, निवृत्ती न्याहारकर, राजेंद्र डोखळे, योगेश रायते, विलास रौदळ, कांदा उत्पादक संघटनणेचे भारत दिघोळे, शैलेंद्र पाटील यांनी श्री. पवार यांच्यासमोर प्रश्न मांडले.

शेतकऱ्यांनी मांडलेली मते

  • कांदाप्रश्नी धोरणाची धरसोड थांबवा.
  • केंद्राने चालू दराने खरेदी करून माफक दरात रेशनद्वारे कांदा वाटावा
  • नाफेड ८०० रुपयांनी खरेदी करून तो कांदा ४ हजारांनी बाजारात विकतेय, त्यातील नफा द्या.  शेतकऱ्यांची कोंडी फोडा
  • कांदा बियाणे दरवाढ, रोपे उगवत नसल्याने संबंधित कंपन्यांवर कारवाई करा
  • आयात थांबवा, साठा मर्यादा काढून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्या
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com