Agriculture news in Marathi Will FRP be lump sum or fragmented? | Agrowon

एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

एफआरपी जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. तर गेल्या वर्षी कारखान्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून शेतकऱ्यांना बिले दिली होती. पण, यावर्षी साखरेचे दर व सॅनिटायझर निर्मितीतून मिळालेल्या नफा लक्षात घेता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळेल, अशी आशा आहे.

सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन कारखाने वगळता उर्वरित सर्व साखर कारखान्यांना गाळप परवाना साखर आयुक्तांकडून मिळाला आहे. काही कारखान्यांच्या टोळ्याही दाखल झाल्या आहेत. पण, एफआरपी जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. तर गेल्या वर्षी कारखान्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून शेतकऱ्यांना बिले दिली होती. पण, यावर्षी साखरेचे दर व सॅनिटायझर निर्मितीतून मिळालेल्या नफा लक्षात घेता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळेल, अशी आशा आहे.  

जिल्ह्यात १६ साखर कारखाने असून, यापैकी गेल्या वर्षी सात सहकारी व सात खासगी साखर कारखान्यांनी गाळप केले. गेल्या वर्षी सर्व कारखाने थोडे उशिरा सुरू झाले. पण, प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात नोंदणी केलेल्या उसाचे गाळप केले. त्यासोबतच एक दोन कारखान्याचा अपवाद वगळता एफआरपीची रक्कमही १०० टक्के अदा केली आहे. पण, कोरोनामुळे व मजुरीच्या प्रश्‍नावरून ऊसतोड मजुरांची उपलब्धता कमी प्रमाणात झाल्यास कारखान्यांना ऐनवेळी हार्वेस्टरचा वापर करावा लागणार आहे. पण, सर्वच कारखान्यांना हार्वेस्टर मशिन वापरणे शक्‍य नाही.

त्यामुळे ऊस तोडणीसाठी टोळ्यांवर हंगामाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तरीही परवाना मिळालेल्या कारखान्यांनी टोळ्या आणण्यास सुरुवात केली आहे. पण, महत्त्वाचा मुद्दा एफआरपीचा आहे. गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम एक दोन कारखाने वगळता सर्वांनी १०० टक्के पूर्ण केलेली आहे. त्यामुळे यावर्षी एफआरपीची रक्कम कारखाने शेतकऱ्यांना एकरकमी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप तरी एकाही कारखान्याने एफआरपीबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. साखरेचे दर व कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मितीतून नफा कमविला आहे. त्यामुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे सोपे जाणार आहे.

कारखान्यांच्या प्रतिसादावर दराचे भवितव्य
शेतकरी संघटनांनी अद्याप यावर्षीच्या ऊसदराची मागणी केलेली नाही. लवकरच ऊस परिषदा होऊन ऊसदराची मागणी होईल. या मागणीकडे कारखाने किती गांभीर्याने पाहणार, यावर यावर्षीच्या दराचे भवितव्य अवलंबून आहे.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...