ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेतून तलाव भरणार का?

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेतून तलाव भरणार का?
ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेतून तलाव भरणार का?

सांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपास सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. यामुळे पाणीटंचाईवर मात करणे सोपे झाले असले तरी या योजनांच्या लाभ क्षेत्रात असणारे तलाव पाटबंधारे पाण्याने भरून देणार का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. त्यातच पाण्याची मागणी असेल तरच पाणी दिले जाणार, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते आहे.  

जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहाकांळ, मिरज या तालुक्यातील शेतीला ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूचे पाणी मिळते. सध्या पाणीटंचाई असल्याने ताकारी आणि टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू असून देखील आटपाडी, खानापूर, आणि कडेगाव, तासगाव तालुक्यातील पाणीटंचाई कमी झाली नाही. वास्तविक पाहता केवळ मुख्य कालव्यानेच पाणी पुढे जात आहे. त्यामुळे मुख्य कालव्यालगत असणार्या शेतीला याच पाण्याचा उपयोग होत असल्याचे दिसते आहे.  

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूचे ऑक्टोबरमध्ये आवर्तन सुरू होते. या वेळीदेखील पाटबंधारे विभागाने दुष्काळी भागातील तलाव या योजनेतून भरून देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून तलाव भरले असल्याचे ठोसपणे सांगितले. तलाव भरले असते तर पाणीटंचाई भासली नसती. याचाच अर्थ असा की, योजनेतून तलाव भरले नव्हते.म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून १६४ तलाव भरून देणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. मात्र, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेतून तलाव भरणार का नाहीत, याबाबत पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे योजनेतून तलाव भरणार का, याकडे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  

मागणी नसल्यास पाणी नाही पाणीटंचाई आहे, अशी मागणी केली तरच पाणी मिळणार आहे. अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. वास्तविक पाहता पाणीटंचाई आहेच. मग पाण्याची मागणीची वाट का पहावी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पाणी सोडण्याची मागणी आहे. पाण्याची मागणी नसेल तरीदेखील पाटबंधारे विभागाने पाणी सोडले पाहिजे. तीन ही योजनेतून तलाव भरून दिले पाहिजेत. केवळ आश्वासन नको.   - विनायक माळी, कवठेमहांकाळ, जि. सांगली  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com