Agriculture News in Marathi Will Mahavikas lead in elections? | Agrowon

निवडणुकीत होणार महाविकास आघाडी?

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅंक निवडणुकीतही महाविकास आघाडी झाल्याचे चित्र दिसेल का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅंक निवडणुकीतही महाविकास आघाडी झाल्याचे चित्र दिसेल का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात राज्यभर सत्ता संघर्ष पेटला आहे. एकमेकांवर टीकेच्या फैरी सुरू आहेत. कार्यकर्ते समाज माध्यमांवरून खुन्नस देत आहेत. मात्र जिल्ह्यातील नेतेमंडळी मात्र फारसे एकमेकाला अंगावर न घेता कलाकलाने राजकारण करताना दिसतात. मात्र आता निवडणूकच असल्याने लुटूपुटूची का असेना लढाईची भाषा करावी लागत आहे. जिल्हा बॅंकेचे नेतृत्व जयंतरावांकडे आहे. राज्यात सत्ता बदलली तरी इथे सर्वपक्षीय ‘कारभार’ सुरूच होता.

आता ही निवडणूक बिनविरोध करून बॅंकेवरील पकड मजबूत करण्याच्या ते तयारीत होते. त्यासाठी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही बनवला होता. मात्र आता राज्यातील वातावरण चिघळल्याने इथे काय करावे? असा त्यांच्यासमोर पेच आहे. नेहमीप्रमाणे ‘आर्थिक संस्थेत राजकारण नको’ अशी ढाल पुढे करीत हा संघर्ष टाळण्याचा त्यांचा पवित्रा होता. येथील भाजप नेहमीच ‘जयंत जनता पार्टी’ म्हणजेच ‘जेजेपी’ असायची. मात्र आता भाजपमधील एक गट जयंत पाटील यांच्या समवेत जाण्यास तयार आहे आणि एका गटाने अजून भूमिका जाहीर केलेली नाही. 

 जयंतराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या धोरणाचाच भाग असणार आहे. राज्यभर स्वतंत्रपणे पक्ष वाढीसाठी ते दौरे करीत आहेत. त्यामुळे येथेही त्यांना भाजप नेत्यांसोबतचे सख्य विसरून लढावे लागेल, असे संकेत आहेत. हा पेच जसा जयंतरावांसमोर आहे तसाच येथील भाजप नेत्यांसमोरही आहे. त्यांना वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून महाविकास आघाडीशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मौनात असलेल्या नेत्यांना येत्या आठवडाभरात वाचा फुटण्याची शक्यता आहे. अर्थात ते एकमेकांची उणी-दुणी कशी काढणार हा पेच आहेच कारण जे काही झाले आहे, त्याची सामुहिक जबाबदारी सर्वांवरच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत फटाके फुटतील.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...