स्मार्टसिटी वादात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही ः शरद पवार

Will not allow injustice to farmers: Sharad Pawar
Will not allow injustice to farmers: Sharad Pawar

नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद येथील स्मार्टसिटी अंतर्गत प्रस्तावित नगरपरियोजनेला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यासंदर्भात लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. वादावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री, स्मार्ट कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन ही त्यांनी दिले.

नगरपरियोजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी श्री. पवार यांची भेट घेतली. श्री. पवार शुक्रवारी (ता. १७) नाशिक दौऱ्यावर आले असताना नगरपरियोजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले. 

स्थानिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध असताना बळजबरीने योजना लादली जात आहे. ज्या जागेवर योजना राबविली जाणार आहे, ती बागायती जमीन असून, फळांसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. योजना शहरापासूनच्या दूर अंतरावर किंवा पडीक जमिनीवर राबविण्याची गरज असताना बागायती जमिनीवर राबविली जात आहे. या वेळी गोकुळ पिंगळे, सुरेश पाटील, पंडित तिडके, अरुण महाले, शरद फडोळ, नाना तिडके, संजय पिंगळे, वासुदेव तिडके, दिनेश बच्छाव, गणपत फडोळ आदी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com