agriculture news in marathi will not go home till Agriculture laws are cancelled Rakesh Tikait | Agrowon

कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय घरी परतणार नाही : राकेश टिकैत

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी घरी परतणार नाही. आंदोलनाची जागा आता शेतकऱ्यांचे घर बनली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या ठिकाणीच सुरू करावे, असे भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी घरी परतणार नाही. आंदोलनाची जागा आता शेतकऱ्यांचे घर बनली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या ठिकाणीच सुरू करावे, असे भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.
 
नवीन शेती कायद्याच्या विरोधात शेकडो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आहेत. शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येत असल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर टिकैत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, ‘‘आंदोलन स्थळ हेच आता शेतकऱ्यांचे घर झाले आहे. ते सोडून त्यांना कुठे जायला सांगणार? कोरोनाचा फैलाव काय येथून होतोय का? हे तर आमचे घर आहे. अनेक शेतकऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अनेक जण दुसरा डोस मिळावा म्हणून झगडत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी येथेच लसीकरण सुरू करावे.’’ 

इफ्तारवेळी शेतकऱ्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला जात आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहो. त्यावर टिकैत म्हणाले, की पन्नास जणांना एकत्र येण्यास सरकारची परवानगी आहे. तिथे फक्त २२ ते ३५ लोक होते. तेही पुरेसे अंतर ठेवून बसलेले होते. कुणी कुणास भेट नाही आणि हस्तांदोलनही केले नाही. 
 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...