घरात बसणार नाही, राज्यभर दौरा काढणार ः पंकजा मुंडे

Will not sit at home, tour all over the state: Pankaja Munde
Will not sit at home, tour all over the state: Pankaja Munde

परळी, जि. बीड : ‘‘बंड केले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. घरात बसणार नाही, वाघीण जंगल सोडून जाणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे. एकनाथ खडसे, आकाश फुंडकर व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत. मी कोअर कमिटीतून मुक्त होत आहे, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. 

पांगरी येथील गोपीनाथगडावर गुरुवारी (ता. १२) लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अभिवादन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पक्षबदलावर थेट भूमिका घेतली नसली, तरी त्यांनी नेतृत्वाला सूचक इशारा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता, अतुल सावे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, महादेव जानकर, आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, बबनराव लोणीकर, रोहिणी खडसे, माधुरी मिसाळ, आकाश फुंडकर, मेघना बोर्डीकर, रमेश आडसकर, कर्डिले, नमिता मुंदडा, रमेश आडसकर, रमेश पाकळे, भागवत कराड उपस्थित होते. 

श्रीमती मुंडे म्हणाल्या, की मी पराभवाने खचणारी नाही. माझी जनतेशी जोडलेली नाळ कोणी तोडणार नाही. आपण घरच्या भाकरी बांधून संघर्ष यात्रा काढली, पक्षाकडून दमडीही घेतली नाही. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर झालेला असतानाही आपण तेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी एकेक आमदार निवडून आणण्यासाठी काम केले. मग मी बंड का करणार, असा सवाल त्यांनी केला. बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. 

मुख्यमंत्री माझे भाऊ  ठाकरेजी तुम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करा, असे आवाहन करत उपस्थितांना घाबरू नका मुख्यमंत्री माझा भाऊ आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

खडसेंचा हल्लाबोल; पाटलांचा सबुरीचा सल्ला  दरम्यान, या वेळी एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांसमक्ष भाजप व देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला, आपण आणि गोपीनाथराव मुंडेंना बदनाम करण्यामागेही पक्षातीलच लोक होते, असा थेट आरोपही त्यांनी केला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. कुठपर्यंत सहन करणार असे सांगून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत; पण आपला भरोसा धरू नका, असे सांगत पक्षांतराचे संकेत दिले. तर, चंद्रकांत पाटील यांनी भावना व्यक्त करा, तुमची दखल घेतली जाईल. गोपीनाथराव मुंडेंचे पक्षासाठी असलेले योगदान विसरले जाणार नाही, असेही सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com