Agriculture news in marathi Will not work without compensation: MLA Bharat Bhalke | Agrowon

मोबदल्याशिवाय काम करू देणार नाही : आमदार भारत भालके

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्याबाबत जो विषय न्यायप्रविष्ट आहे, त्याबाबत बोलणे उचित नाही. दावे आणि तक्रारी सोडून इतरांचा मोबदला अदा केला. उर्वरित मोबदल्यासंदर्भात आमदारांची भेट घेऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल. 
- उदयसिंह भोसले, प्रांताधिकारी

 मंगळवेढा, जि. सोलापूर  ः ‘‘मंगळवेढा तालुक्‍यात रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांना भूसपांदनाचे पैसे न देताच ठेकेदारांकडून पोलिस बळाचा वापर केला जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. मोबदला दिल्याशिवाय काम करू नये. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल’’, असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला. 

मंगळवेढा तालुक्‍यात महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तालुक्‍यात माचणूर, ब्रह्मपुरी, मंगळवेढा, गणेशवाडी, आंधळगाव येथे ठेकेदाराकडून शेतकऱ्यांवर बळजबरी होत आहे. रस्त्यांचे काम पोलिस बळाचा वापर करून केले जात असल्याने शेतकऱ्यांनी आमदार भालके यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याशी भालके यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. 

भालके म्हणाले, ‘‘ज्यांना भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत, ते शेतकरी शेकडो वर्षांपासून मालक आहे. उतारे त्यांच्या नावे निघत आहेत. ते जमीन कसत असताना काझी नामक शेतकऱ्याने मालकी हक्क सांगून शेतकऱ्यांना मोबदला देण्यास विरोध केला. याबाबत उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत व शेतकऱ्यांना मोबदला दिल्याखेरीज काम करू नये.’’

शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर

‘‘एकीकडे जमीन जाऊनही मोबदला नाही आणि दुसरीकडे ठेकेदाराकडून पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्याच्या पिकाचे व घराचे नुकसान केले जात आहे. जिथे शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, तेथील रस्ता करण्यास कोणाचीही आडकाठी नाही. सध्या जिल्ह्यात १४४ चे कलम लागू आहे. कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे काम प्रशासनाचे आहे. परंतु, पोलिस बळाचा वापर शेतकऱ्यांवर करत असतील, त्यांच्या न्यायासाठी १४४ चे उल्लंघन करून आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा आमदार भालके यांनी दिला. 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...