इथेनॉलनिर्मिती देईल  शेतकऱ्यांना श्रीमंती : नितीन गडकरी

नगर जिल्ह्यातून सुरू झालेल्या सहकारी साखर कारखानदारीने राज्यातील शेती क्षेत्राचा मोठा विकास केला आहे. साखरेच्या दरावर कारखानदारी चालते. यापुढे कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती करून आर्थिक उत्पन्न वाढविले पाहिजे.
इथेनॉलनिर्मिती देईल  शेतकऱ्यांना श्रीमंती : नितीन गडकरी Will produce ethanol Wealth to farmers: Nitin Gadkari
इथेनॉलनिर्मिती देईल  शेतकऱ्यांना श्रीमंती : नितीन गडकरी Will produce ethanol Wealth to farmers: Nitin Gadkari

नगर : नगर जिल्ह्यातून सुरू झालेल्या सहकारी साखर कारखानदारीने राज्यातील शेती क्षेत्राचा मोठा विकास केला आहे. साखरेच्या दरावर कारखानदारी चालते. यापुढे कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती करून आर्थिक उत्पन्न वाढविले पाहिजे.

इथेनॉलनिर्मितीतूनच कारखाने टिकतील, शेतकऱ्यांना आधिक दर देणे शक्य होईल. इथेनॉलनिर्मितीची फायदा शेतकऱ्यांना होऊन शेतकरी श्रीमंत होईल. साखरेच्या दराची आणि इतर बाबींचा विचार करता नवीन साखर कारखाना सुरू करण्याला परवानगी मिळू नये, नाही तर भविष्यात कारखानदारीची अवस्था बिकट होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी केले.  नगर येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरणाच्या ५२७ किलोमीटरच्या व ४ हजार २७ कोटी रुपयांच्या पंचवीस प्रकल्पाचे भूमिपूजन, लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.  गडकरी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या हितासाठी उसासह तांदूळ, मका व इतर धान्यांपासून इथेनॉलनिर्मितीचे धोरण केंद्र सरकारने ठरवले आहे. पेट्रोलपेक्षा इथेनॉल चांगलेच आहे. त्यामुळे वाहनात इथेनॉलचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकार केंद्र सरकार ते खरेदीची हमी घेत आहे. देशासाठी १६५० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे जेवढे तयार होईल, तेवढे भारत सरकार खरेदी करेल. आता इथेनॉल तयार करणारे उद्योग टाकण्यासाठी अर्ज येत आहेत. अमेरिका, ब्राझीलमध्ये शंभर टक्के इथेनॉलचा वापर होत आहे. दर वर्षी इंधन आयातीसाठी १२ लाख कोटी रुपये खर्च होतात. इथेनॉलनिर्मितीतून त्यातील ५ लाख कोटी रुपये कमी झाले तरी ते पैसे शेतकऱ्यांच्या खिशात जातील. साखरेच्या दरावर उसाची किंमत ठरत असल्याने हा प्रश्‍न जटील होत आहे. त्यामुळे त्यातून इथेनॉलनिर्मितीच मार्ग काढू शकते. विकास व्हायचा असेल तर पाणी, ताकद, वाहतूक, संपर्क या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नवे उद्योग येण्यासाठी चांगले रस्ते आणि त्यातून नवीन रोजगारनिर्मिती हे गणित आहे. अमेरिका श्रीमंत म्हणून ‘चांगले रस्ते नव्हे, तर चांगले रस्ते म्हणून अमेरिका श्रीमंत’ असे आहे. रस्ते बांधणीसोबतच रस्त्यांवर येणाऱ्या नाले, नद्यांवर पूल बांधताना पाणी आडवा, पाणी जिरवा उपक्रमही आम्ही राबवत आहोत. खाद्यतेल आयातीवर १ लाख ६० हजार कोटी खर्च होत आहेत. त्यामुळे उसात तेलबियांचे उत्पादन घेऊन तेल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत.’’ 

उसाबाबत आव्हानात्मक परिस्थिती होईल : शरद पवार  शरद पवार म्हणाले, ‘‘राज्यात यंदा जास्त पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा काळात उसाचे पीकच शेतकऱ्यांना आधार देणारे वाटत आहे. पुढील दोन वर्षे मुबलक पाणीसाठा राहील. या काळात उसाच्या लागवडी वाढतील आणि त्यामुळे पुढील काळात आव्हानात्मक परिस्‍थिती येईल, असे दिसते. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना, कारखानदारांना इथेनॉलकडे वळावे लागेल. केंद्र सरकारने धोरण ठरले असून, त्यासाठी नितीन गडकरी यांचा पुढाकार आहे. अर्थकारण वाढण्यासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. त्यासाठी नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून मोठी कामे होत आहेत. विकासाला यातून चालना मिळत आहे.’’  दूध उत्पादन वाढीला प्राधान्य  नितीन गडकरी म्हणाले, ‘‘राज्यात व देशात दूध उत्पादन वाढीसाठी भर दिला जात असून, त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. ब्राझीलमध्ये विकसित झालेल्या टोमॅन्टो वळूचे सॉर्टेड सीमेन वापरून भारतातील देशी गाईंसाठी वापरून ९९ टक्के गाय जन्मली पाहिजे यावर भर दिला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे जन्मलेली गाय जास्तीचे दूध देईल, असे अत्याधुनिक सीमेन माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यातील दूध उत्पादन वाढीबाबत दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांच्यासोबत बैठक घेतली. देशात अधिक दूध देणाऱ्या देशी गाई तयार करणारे प्रकल्प सुरू करीत आहोत. महाराष्ट्रात २०० प्रकल्प उभे केले जात आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com