पाच कोटी तरुणांना रोजगार देणार ः नितीन गडकरी

Will provide employment to 5 crore youth  ः Nitin Gadkari
Will provide employment to 5 crore youth ः Nitin Gadkari

पुणे ः देशाच्या एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेत कृषी, खादी ग्रामोद्योग आणि लघू उद्योगाचा २९ टक्के वाटा आहे. यातून अकरा कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. खादी ग्रामोद्योगातून सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. येत्या पाच वर्षांत ती पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यासोबतच पाच कोटी तरुणांना रोजगार देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मध उत्पादन, बांबू, मत्स्य या व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती लघू व मध्यम विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

केंद्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सोमवारी (ता. ६) भेट दिली. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी खादी ग्रामोद्योगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाव, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. सी. केरकटा, खादी ग्रामोद्योगाच्या केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. संजीब रॉय, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. एम. टी. वाकोडे, वैज्ञानिक डॉ. आर. पी. फडके, के. के. क्षीरसागर, डॉ. लक्ष्मी राव, डॉ. थॉमस, राजेंद्र कणसे आदि उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले की, ‘‘ग्रामीण, आदिवासी भागात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी कृषी व वन व्यवसायाला प्रोत्साहन देत कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे. यामध्ये बांबूपासून तेल तयार करणे, बांबू उत्पादने, बायोडिझेल, बायोमास असे प्रक्रिया उद्योग सुरू करता येऊ शकतात.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com