हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागा देणार : नगराध्यक्षा अरुणा माळी
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला थेट ग्राहक मिळावा, या साठी नगरपालिकेच्या वतीने शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी दिली.
मंगळवेढा, जि. सोलापूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला थेट ग्राहक मिळावा, या साठी नगरपालिकेच्या वतीने शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या विकेल ते पिकेल या उपक्रमांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचे उद्घाटन प्रसंगी माळी बोलत होत्या. या वेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, नगरसेवक प्रशांत यादव, गौरीशंकर बुरकुल, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, राजेंद्र भांगे, प्रशांत काटे उपस्थित होते.
माळी म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांना अशा छोट्या छोट्या उपक्रमातूनही मोठा आधार मिळणार आहे. आपण सर्वांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही पुढाकार घेतला आहे आणि भविष्यातही घेऊ.’’ तालुका कृषी अधिकारी श्रीखंडे म्हणाले, ‘‘आत्माच्या मान्यतेने शेतकरी स्वयंसहायता समूहातील सदस्य भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये भाजीपाला विक्रीसाठी छत्री वाटप केले आहे. ग्राहकांना ताजा शेतमाल उपलब्ध होईल व शेतकऱ्यांच्या शेतीमालास रास्त भाव मिळेल यातून दोघांचेही हित जोपासणे शक्य आहे.’’
पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कृषी विभागातील राजकुमार ढेपे, विक्रम सावजी, शैलेंद्र पाटील, विक्रम भोजने, पवन पाटील, मनीषा कव्हाळे, किरण मलाबादि, वर्षा सूर्यवंशी, रमेश नकाते, जावेद यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रशांत काटे यांनी केले.