agriculture news in marathi, Will raise voice against Uyuni pollution: MP Naik Nimbalkar | Page 2 ||| Agrowon

उजनीतील प्रदूषणाविरुद्ध आवाज उठविणार : खासदार नाईक-निंबाळकर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 जून 2019

दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी केळीच्या बागा जळाल्या आहेत. परिणामी, बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे केळी बागायतदारांना दुष्काळ निधीतून मदत करावी, यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून मदत मिळवून देणार आहे. 
- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार

टेंभुर्णी, जि. सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, रेल्वेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्याने लक्ष देणार आहे. पुणे जिल्ह्यातून मुळा- मुठा नदीद्वारे मलमूत्राचे पाणी उजनी धरणामध्ये येते. पुढे ते देशाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरला जाते. काळ्या दुर्गंधीयुक्त मलमूत्राचे पाणी भाविकांना पिण्यासाठी व अंघोळीसाठी वापरावे लागते. त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी संसदेत आवाज उठविणार आहे, अशी माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. 

खासदार नाईक-निंबाळकर हे निवडणूक निकालानंतर प्रथमच टेंभुर्णी येथे आले. या वेळी त्यांनी माढा तालुक्‍यातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, ज्येष्ठ नेते ॲड. कृष्णात बोबडे, दादासाहेब साठे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील आदी उपस्थित होते. 

नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘मतदारसंघातील लोकांना भेटून अडीअडचणी जाणून घेतल्या. आतापर्यंतचे दुर्लक्षित प्रश्‍न सोडविणार आहे. रस्ते वीज, सीना माढा उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करून माढा तालुक्‍यातील योजनेच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागाला सारखे पाणी मिळाले पाहिजे. यासाठी जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी शासनाकडे आग्रही आहे. स्थिरीकरण योजनेतून उजनी धरणामध्ये पाणी आल्यानंतरच मराठवाड्याला पाणी देण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी कसा आणता  येईल याकडे लक्ष देणार आहे.’’

इतर बातम्या
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...