agriculture news in marathi Will seeds and fertilizers be available in time for kharif season in Sangli district? | Agrowon

सांगली : खरीप हंगामासाठी बियाणे, खते वेळेत मिळणार का?

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातूनही खरीप हंगाम पेरणीसाठी पैशांची तरतूद केली आहे. परंतू, सोयाबीनचे बियाणे कमी आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दर जादा सांगत आहेत. उसाचे बिल पूर्ण मिळालेले नाही. त्यामुळे हंगामात पैशाची अडचण भासणार आहे. कारखान्याने रक्कम अदा करावी. 
- तात्यासो नागावे, खटाव, ता. पलूस 

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामासाठीची तयारी केली आहे. तरीही हंगामात आर्थिक अडचणींमुळे बियाणे, खते, वेळेत मिळणार का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सरासरी ३ लाख ४८ हजार हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले. जिल्ह्यात वारणा, कृष्णा नदीकाठासह बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होतो. शिराळा तालुक्‍यात भात पिकाचे क्षेत्र अधिक असते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाही हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. अनेक भागात मशागती पूर्ण झाल्या आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. 
कृषी विभागाने ५२ हजार ८५३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली आहे. खतांची १ लाख २९ हजार मेट्रिक टन मागणी केली आहे. शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे देण्याचे नियोजन कृषी विभाग करु लागला आहे. 

गेल्यावर्षी महापूर, यंदा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरवातीच्या काळात बाजार पेठा सुरु नसल्याने शेत माल विक्री करता आला नाही. त्यात कारखान्याचे गाळप संपले आहे. शेतकऱ्यांची बिले अदा केलेली नाहीत. त्यातच द्राक्षाचे पैसे व्यापाऱ्यांकडेच अडकले आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. ते देखील मिळालेले नाही. सध्या पीक कर्जाचे वाटप सुरु असले, तरी अनेक शेतकऱ्यांना त्या पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. 

भाजीपाला लागवडीसाठी, ऊस पिकासाठी कृषी निविष्ठा केंद्राकडून, बियाणे, खते उधारीवर खरेदी केली होती. बिले आल्यानंतर पैसे अदा केला जाणार होते. परंतू, सर्वबाजूंनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्राची उधारी जमा करता आली नाही. परिणामी, खरीप हंगामात लागणारी बियाणे, खते उधारीवर मिळणे कठीण झाले आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...