Agriculture News in Marathi Will solve the problems of transporters | Page 3 ||| Agrowon

वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल. वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना या दर्भात निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली.

मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल. वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना या दर्भात निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली. महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृहात ठाकरे यांची भेट घेतली. 

या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील. मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्याच येईल.’ 

तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा 
चित्रपटगृह चालकांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स ॲन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल, यासाठी योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढणार
राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होतील. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...