agriculture news in marathi will take action if any body hurdles farmers : AGM Dada Bhuse | Agrowon

शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवू : कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

खते, बियाण्यांचा काळाबाजार, साठवणूक आणि शेतकऱ्यांची अडवणूक कोणाकडूनही होणार नाही. मात्र, असे झाल्याचे उघड झाले तर या कारवाईबाबत बोलण्यापेक्षा कृतीतूनच दाखवून देईन : कृषिमंत्री दादा भुसे 

नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे. खते, बियाण्यांचा काळाबाजार, साठवणूक आणि शेतकऱ्यांची अडवणूक कोणाकडूनही होणार नाही. मात्र, असे झाल्याचे उघड झाले तर या कारवाईबाबत बोलण्यापेक्षा कृतीतूनच दाखवून देईन. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा, इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिला.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.२८) खरीप आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेख कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार निलेश लंके, आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थित होती.

कृषिमंत्री भुसे म्हणाले,‘‘कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असले तरी शेतीच्या कामांना सूट दिली होती. खरिपात कोणाचाही अडवणूक होणार नाही याबाबत जिल्हा अधीक्षकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे अशा काळात प्रत्येकाने सेवाधर्म म्हणून काम केले पाहिजे. अशा परिस्थिती कोणी अडवणूक होणार नाहीच, पण कोणी चढ्या दराने बियाणे, खताची विक्री करत असेल, कोणी साठवणूक केली असेल किंवा शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण करत असेल तर आम्ही बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवून देणार आहोत. खते, बियाणे कमी पडणार नाहीत याचे नियोजन केले आहे.

सारं काही आलबेल..!
नगर जिल्ह्यात खरिपात मोठे क्षेत्र असते. मात्र कृषी विभागाकडून पाहिजे तसे नियोजन केले जात नाही. मंत्री, अधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी मात्र कागदे रंगवून दिशाभूल करत असल्याचा अनेक वेळचा अनुभव याही बैठकीत आला. बांधावर खते, बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. अधिकारी-कर्मचारी थेट बांधावर जाऊन माहिती देत असल्याची माहिती सांगत योजना, अनुदानाबाबत मंत्र्यांनी माहिती देत कृषी विभागात सारं काही आलबेल असल्याचे बैठकीत दाखवून दिले. विशेष म्हणजे किती शेतकऱ्यांनी बांधावर खते, बियाणे मागितले याचा साधारण आकडाही कृषीच्या अधिकाऱ्यांकडे नाही. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...