Agriculture News in Marathi Will there be higher rates than FRP? | Page 3 ||| Agrowon

एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?

राजकुमार चौगुले
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

 प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादकांसाठी एफआरपीपेक्षा जादा दर मागत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे यंदाचा हंगाम विनाअडथळा सुरू होणार, हे मात्र निश्चित झाले आहे.

कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादकांसाठी एफआरपीपेक्षा जादा दर मागत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे यंदाचा हंगाम विनाअडथळा सुरू होणार, हे मात्र निश्चित झाले आहे. प्रत्येक वर्षी ऊस हंगाम आला की स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेते, यावरच कारखानदारांची ही भूमिका ठरत असते. संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचा प्रतिकूल परिणाम ऊसतोड कामगार व कारखान्यांच्या गाळपावर होत असतो. यंदा मात्र कारखान्यांच्या नियोजनानुसार ऊस गाळप सुरू होणार असल्याने या परिषदेनंतर साखर कारखानदारांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

एफआरपी जाहीर केल्यामुळे तणाव कमी
ऊस परिषद सुरू होण्यापूर्वी यंदा मात्र तणाव काहीसा कमीच होता, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी एक रकमी एफआरपीची मागणी होती, ती मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी मान्य केली होती. परिषद होण्यापूर्वी चार दिवस अगोदर दररोज एकेका कारखान्याने एफआरपी इतकी रक्कम देण्याचे जाहीर केल्याने स्वाभिमानी कोणती भूमिका घेणार याकडे उत्पादकांचे लक्ष लागले होते. स्वाभिमानी कोणतीही भूमिका देऊ दे ती यंदाचा हंगाम पहिल्या टप्यांत तरी रोखू शकणार नाही, असा सर्वांचा अंदाज होता. स्वाभिमानीची पहिली मागणी कारखान्यांनी मान्य केल्याने स्वाभिमानी अटी ठेवेल, पण हंगाम सुरू ठेवूनच असाही अंदाज होता, तो खरा ठरला. आपली काही तरी भूमिका असावी, या अनुषंगाने स्वाभिमानीने एफआरपीपेक्षा जास्त रक्कम मागत आंदोलन जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाविकास आघाडीवर आरोपांची राळ
यंदाची ऊस परिषद लक्षवेधी ठरली ,ती केंद्र आणि राज्य सरकार विरोधात होणाऱ्या टीकेने. महाविकास आघाडीचा सहयोगी पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याच सरकारवर आरोपांची राळ उठवली हे विशेष. प्रत्येक वर्षी संघटनेचे नेते आपल्या विरोधात असणाऱ्या पक्षाच्या नेत्यावर आरोप विरोध प्रत्यारोप करतात पण यंदा हे चित्र उलटे दिसले. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यावर आरोप प्रत्यारोप केले, हे पाहता येत्या काही दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र लढेल हे निश्चित झाले आहे. किंबहुना फक्त औपचारिकता उरली आहे. हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परिषदेतच जाहीर केला असता तर उसा ऐवजी इतर गोष्टीत चर्चा झाली असती, त्यामुळे शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोडण्याचे सूतोवाच करीत निर्णय पुढे ढकलला, पण त्यांचा निर्णय झालेला आहे, असे म्हटले जात आहे.

आंदोलनाची उत्सुकता
ऊस उत्पादक व साखर कारखाना पातळीवर मात्र इथून पुढील काळात स्वाभिमानी कसे आंदोलन करते याची उत्सुकता आहे. या  पूर्वी स्वाभिमानीने अनेकदा सुरू हंगाम बंद करण्याचा इशारा  दिला. एकदा  हंगाम सुरू झाला की तो बंद करणे स्वाभिमानीला शक्य झाले नाही. पहिल्या उचलीचा वेळी तडजोड केल्यानंतर आंदोलनाच्या घोषणा केल्या जातात, त्या हळूहळू फिक्या पडत असल्याचा अनुभव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाबतीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येथून पुढच्या काळात साखर कारखानदारांना फायदा होणारच आहे. पण हा फायदा वेळोवेळी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी स्वाभिमानी किती आक्रमक भूमिका घेते यावरच स्वाभिमानीने दिलेले इशारे किती गंभीर आहेत, हे दिसून येईल.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...