मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान

यावर्षी हळदीच्या पिकाचे बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले असते. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी तयार झालेली हळद वाळू घातली. ती अवकाळी पावसाने भिजून खराब झाली आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने बाहेर गावी गेलेल्यांचे जास्त नुकसान झाले. - दत्तात्रय बोराडे, माजी सभापती, मंठा बाजार समिती.
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान

मंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता. १६ ) रात्री वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंठा तालुक्यात यावर्षी हळदीचे पीक बऱ्यापैकी अाहे. अनेक शेतकऱ्यांनी शिजवून शेतात वाळू घातलेेले हळदीचे पीक भिजले. रात्री पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.  

अंभोडा कदम येथे भारत देवीदासराव बोराडे यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात शेततळे घेऊन, शेडनेट उभारून दुष्काळी परिस्थितीदेखील भाजीपाल्याचे पीक चांगल्याप्रकारे जोपासले. परंतु, मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्याने शेडनेट फाटल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी शाळू ज्वारीच्या कडब्याची वळई (गंजी) रचून ठेवली होती. वादळी वाऱ्याने कडबा उडून गेला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.

अंभोडा कदम परिसरातील पंधरा विजेचे खांब पडले. या भागातील वीजपुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ऐनवेळी वाळू घातलेली हळद जमा करता आली नाही, तर काहींना हळदीवर झाकण्यासाठी प्लॅस्टिकची ताडपत्री मिळाली नाही. आर्डा खारी येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. उडालेले पतरे लागून अच्चुत निवृत्ती कळणे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. भारतराव देवीदासराव बोराडे यांनी शेडनेटमुळे भाजीपाल्याचे पीक चांगल्याप्रकारे जोपासले.

शेततळ्याच्या भरवशावर सीताफळ, अॅपल बोर, लिंबूणी, राय जांभूळ या फळ बागा सध्या चांगल्या स्थितीत आहेत. वीज वितरण कंपनीने या भागातील विजेच्या खांबाची पाहणी करून मोडलेल्या व पडलेल्या वीज खांबाच्या ठिकाणी तात्काळ नवीन वीज खांब बसवून वीजपुरवठा सुरू करावा, शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com