खानदेशात पुन्हा वादळी पाऊस

खानदेशात पुन्हा वादळी पाऊस
खानदेशात पुन्हा वादळी पाऊस

जळगाव : खानदेशात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १५) मध्यरात्री अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी सुसाट वारा होता. काही भागांत वाऱ्यासह दोन ते चार मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे बाजरी, मका पिकात कापणी, मळणीचे काम खोळंबले. नुकसानीच्या भीतीने अनेक शेतकरी केळीची काढणी उरकून घेत असल्याचे चित्र आहे. 

धुळे जिल्ह्यातील कुसुंबा, नेर, कापडणे, न्याहळोद, लामकानी, शिरपूरमधील बभळाज, थाळनेर, तऱ्हाडी भागांतही सुसाट वाऱ्यासह काही वेळ पाऊस झाला. कुसुंबा येथे अर्धा तासभर जोरदार पाऊस झाला. बाजरीचे पीक अनेक ठिकाणी वाकले. काही भागांत कांदा बीजोत्पादनाच्या पिकालाही फटका बसला. शहादा व नंदुरबारातही वादळाचा तडाखा बसला. या भागातही न्याहली, आसाणे, घोटाणे, नाशिंदा भागांत काही वेळ पाऊस झाला. 

जळगावात बाजरीचे नुकसान जळगाव जिल्ह्यात यावलमधील किनगाव, डांभुर्णी, सावखेडासीम भागांत पावसाचा हलका शिडकावा झाला. सुरवातीला १० ते १२ मिनिटे सुसाट वारा सुटला होता. जळगाव तालुक्‍यातील कानळदा, भोकर, कठोरा, किनोद, गाढोदा, खेडी खुर्द भागांतही सुसाट वारा व पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यात कांदा बीजोत्पादनाचे पीक व बाजरीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. 

बाजरी, मका मळणीवर अनेक भागांत बाजरी, मका पिके मळणी, कापणीवर आले आहे. परंतु, मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. सोमवारी सकाळी पावसाळी वातावरण कायम होते. ढगांचा गडगडाटही सकाळी १०.४० च्या सुमारास सुरू होता. यामुळे पीक कापणीचे काम शेतकऱ्यांनी थांबविले. कारण, कापणी करून पाऊस आला, तर कणसांचे नुकसान होईल. मळणीचे काम आणखी लांबणीवर पडेल.  नुकसानीच्या भीतीने केळीची काढणी शेतकरी करून घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com