भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
वायनरी, पैठणी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न ः मंत्री सामंत
नाशिक : ‘‘शिवनई (ता. दिंडोरी) येथील ग्रामस्थांच्या कौशल्य विकासासाठी काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रम विशेषत्वाने सुरू करण्यात येतील,’’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
नाशिक : ‘‘पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राअंतर्गत स्थानिक उद्योगांना पूरक असणारे म्हणजेच नाशिक येथील वायनरी तसेच पैठणी व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच शिवनई (ता. दिंडोरी) येथील ग्रामस्थांच्या कौशल्य विकासासाठी काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रम विशेषत्वाने सुरू करण्यात येतील,’’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
नाशिक येथे प्रस्तावित पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी आणि त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार सुहास कांदे, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, नगर उपकेंद्राचे समन्वयक डॉ. नंदकुमार सोमवंशी, प्रांताधिकारी संदीप आहेर आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले,‘‘दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील प्रस्तावित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरच सुरु होईल. याबाबत ग्रामस्थ आणि प्रशासनातील गैरसमज दूर झाले आहेत. येत्या दीड महिन्यात उपकेंद्राचे काम सुरु होईल. येत्या काळात मुक्त विद्यापीठाचा विस्तार ग्रामीण भागासह गोवा आणि देशातील इतर राज्यात होईल. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मुक्त विद्यापीठाचा ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्यासाठी देवळाली येथे ग्रामपंचायत स्तरावर मुक्त विद्यापीठाचे केंद्र पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात यावे.``