जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारीची पेरणी सुरू

दादर ज्वारीची पेरणी अनेक भागांत सुरू झालेली आहे; परंतु दादरचे दर पेरणी करतानाच कमी दाखविले जातात; पण याकडे दुर्लक्ष करून शेतकरी पेरणी करीत आहे. यंदा वाफसा हवा तसा नाही, पण दादरच्या बियाण्याची उगवण शक्ती चांगली आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, आसोदा, जि.जळगाव
दादर ज्वारीची पेरणी सुरु
दादर ज्वारीची पेरणी सुरु
जळगाव : जिल्ह्यातील कोरडवाहू पीक असलेल्या रब्बी ज्वारी म्हणजेच दादरची पेरणी सुरू झाली आहे. उडीद, मुगाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रावर दादरची पेरणी सुरू असून चोपडा, जळगाव, अमळनेर, यावल, मुक्ताईनगरमधील काळ्या कसदार जमिनीत पेरणीला याच आठवड्यात सुरवात झाली आहे. 
 
जिल्ह्यातील हलक्‍या व मुरमाड जमिनीत दादरची पेरणी केली जात नाही. केवळ काळ्या कसदार जमिनीत पेरणी केली जाते. दादर हे पूर्णतः कोरडवाहू पीक आहे. तिची पेरणी दिवाळीपूर्वी करण्याची परंपरा आहे. ती जोपासत हलक्‍या वाफशात व काहीशा उष्णतेमध्ये पेरणी सुरू झाली आहे. 
 
दादर ज्वारीचे बियाणे हे परंपरागत आहे. कुठल्याही बियाणे विक्री केंद्रावर दादरचे परंपरागत वाण मिळत नाही. शेतकरी वर्षभर बियाण्याचे जतन करतात. रब्बी सुरू होताना तिची पेरणी करतात. रुचकर, शुभ्र, थोडी गोड व कुरकुरीत भाकरी होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये दादरचा वापर रोजच्या अन्नासाठी केला जातो. शहरांमध्ये तिला विशेष मागणी आहे. 
 
जिल्ह्यात यंदा जवळपास २५ हजार हेक्‍टरवर दादरची पेरणी अपेक्षित आहे. या आठवड्यात अनेक ठिकाणी पेरणी पूर्ण होईल. पेरणीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मुगाच्या रिकाम्या क्षेत्रात जमीन सपाट करण्यासाठी पाटी फिरवून घेतली आहे. यानंतर पेरणी केली जात आहे. पेरणीसाठी नांगरनळीचा उपयोग केला जात असून, यामुळे बियाणे जवळपास अडीच ते तीन इंच खोलवर पडून उगवण किमान ८० ते ८५ टक्के होईल, असे दिसून येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com