हिवाळी अधिवेशन दोन आठवड्याचेच

पावसाळी अधिवेशन तीन दिवसांत आटोपल्याने हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे चालणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
nagpur session
nagpur session

नागपूर: पावसाळी अधिवेशन तीन दिवसांत आटोपल्याने हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे चालणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळण्याची तयारी सरकारने केली आहे. दुसरीकडे प्रशासनाने अधिवेशनाची तयारी सुरू केली असून ५० कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.  हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काँग्रेसच्या काही नेत्यांनी अधिवेशनाला विरोध दर्शविला. यावर होणार खर्च कोरोनासाठी खर्च करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी आग्रही आहेत. ठरल्यानुसारच अधिवेशन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दोन आठवड्यांचा हा कार्यक्रम आहे. ७ डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंतचा हा कार्यक्रम आहे. असे असले तरी एक आठवड्याचा जादा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या सभापतींनी दिल्या आहेत.

१९ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार तारांकित प्रश्न पावसाळी अधिवेशन कमी दिवसांचे असल्याने तारांकित प्रश्न वगळण्यात आले होते. संसदेत तारांकित प्रश्न वगळल्याने विरोध झाला होते. यावेळी ते स्वीकारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रश्नांसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत सूचना करण्याची मुदत आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील प्रश्नसूचना १० नोव्हेंबरपर्यंत करावयाच्या आहे.  

असे असणार नियोजन

  • विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवासाचे निर्जंतुकीकरण करणार.  
  • देखभाल दुरुस्ती तसेच रंगरंगोटीचे कामही होणार.
  • मंडप सजावट व इतर कामेही करण्यात येणार.
  • कामांवर ५० कोटींपेक्षा जास्त खर्चाचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com