agriculture news in marathi, within three years new technology will be developed assures VC | Agrowon

तीन वर्षांत आंब्याचे नवे प्रगत तंत्रज्ञान विकसित करू
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

वेंगुर्ले, सिंधुदुर्गः येत्या तीन वर्षांत आंब्यावरील संशोधन अधिक जास्त प्रमाणात करून नवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित करू, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी गुरुवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच  इंटरडिसिप्लिनरी सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेनिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळ्दवणेकर, डॉ. संजय भावे उपस्थित होते.

वेंगुर्ले, सिंधुदुर्गः येत्या तीन वर्षांत आंब्यावरील संशोधन अधिक जास्त प्रमाणात करून नवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित करू, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी गुरुवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच  इंटरडिसिप्लिनरी सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेनिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळ्दवणेकर, डॉ. संजय भावे उपस्थित होते.

डॉ. भट्टाचार्य म्हणाले, ‘‘जगभरात कोकणचा हापूस आंबा पोचला. देश विदेशातून तज्ज्ञांनी येऊन याठिकाणी संशोधन केले; मात्र जागतिक स्तरावर आंब्याची म्हणावी तशी प्रसिद्धी झाली नाही. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनातून केलेले कार्य जगासमोर यावे, या उद्देशाने आंबा परिषद घेतली.’’

ते म्हणाले, ‘‘दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने गेल्या ४४ वर्षात कोकणातील हापूस आंबा आणि त्याच्या विविध प्रजातींवर महत्त्वपूर्ण असे संशोधन केले आहे. यात आवश्‍यक बदल करता यावे तसेच इतर संशोधनात्मक प्रयोग करता यावे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले. जगभरातील प्रमुख आंबा उत्पादक देशातील तज्ञांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे. कोकणात पूर्वी १० हजार हेक्‍टरवर असलेली आंबा लागवड आता १ लाख ७५ हजार हेक्‍टर पर्यंत पोहचलेली आहे. येथे स्थानिक आंबा शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे घराघरात आंबा फळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे. तर तालुका पातळीवर त्यावर प्रोसेसिंग युनिट उभारून रोजगार निर्मिती केली जावी, अशा सूचना या परिषदेतून शास्त्रज्ञांकडून आलेल्या आहेत.’’

या आंबा परिषदेमुळे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचा दर्जा वाढला असून लवकरच हे केंद्र आंब्यावर संशोधन करणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनेल.
- डॉ. तपस भट्टाचार्य, 
कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...