Agriculture News in Marathi Without giving usbile No threshing license | Page 2 ||| Agrowon

ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको : स्वाभिमानी शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

मागील वर्षाची थकीत पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे मागील वर्षाच्या गाळप हंगामातील ऊसबिले थकीत आहेत. त्यामुळे मागील वर्षाची थकीत पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता.२४) पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून केली. 

जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) संपूर्ण दिली आहेत, अशाच साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा. काही कारखाने करार करून चार टप्प्यांत एफआरपी देणार असल्याचे सांगत आहेत. काही कारखानदार एफआरपी दिल्याची खोटी माहिती देत आहेत, अशा सर्व कारखान्यांची सखोल चौकशी करावी, शेतकरी व शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई करावी.

जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी सर्वसाधारण सभेमधून काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या सभासदांचे सभासदत्व कायम राहावे. काही कारखानदार काटा मारतात, रिकव्हरी कमी दाखवितात. या प्रकरणांची चौकशी करावी, कारखान्यांच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन घ्याव्यात, आदी मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले. 

या वेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजन शेख, अजित बोरकर, अमर इंगळे, तानाजी शिंदे, अतुल पिसे उपस्थित होते. 

पंढरपुरात बैठक घेऊ 
जे साखर कारखाने १५ ऑक्टोबरच्या आधी पूर्ण एफआरपी देतील, त्यांनाच गाळप परवाना देऊ. तसेच इतर विषयांसाठी लवकरच पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची बैठक घेण्याचे आश्‍वासनही साखर आयुक्त गायकवाड यांनी दिले आहे. 
 


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...