agriculture news in Marathi women arrest in ditch to cashew farmers Maharashtra | Agrowon

काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या महिलेस अटक 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष दाखवून २३ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित महिलेस दोडामार्ग पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. 

सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष दाखवून २३ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित महिलेस दोडामार्ग पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या महिलेने दीड वर्षांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून रातोरात पळ काढला होता. 

जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू बागा आहेत. अधिकतर सेंद्रीय काजू येथे पिकविला जातो. त्यामुळे येथील काजू बी ला चांगला दर दिला जातो. दीड वर्षांपूर्वी मल्लिकार्जुन गावडे आणि दिव्या ओबेरॉय उर्फ शिल्पा राजेश खांडोळकर या दोघांनी झरेबांबर येथे भाडेतत्त्वावर खोली घेऊन काजू जादा दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. अधिकचा दर मिळत असल्यामुळे बागायतदार त्या दोघांकडेच काजू विक्री करू लागले. सुरुवातीला रोकड पद्धतीने ही विक्री सुरू होती. त्यामुळे बागायतदारांचा देखील त्या दोघांवर विश्वास बसला. 

दरम्यान, या प्रकरणातील पहिला संशयित मल्लिकार्जुन गावडे याने अटकपूर्व जामीन मिळाला आहे.परंतु दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक सुनील बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० सप्टेंबरला पुणे येथून दिव्या उर्फ शिल्पा खांडोळकर (वय ४५) हीस ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिली. शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या संशयित महिलेस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशिवाय आणखी कुणाची फसवणूक झाली आहे, असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

२३ लाखांची फसवणूक 
दोडामार्ग तालुक्यातील २० काजू बागायतदारांनी त्या दोघांना २३ लाख २१ हजार रूपये किमतीचा काजू मागाहून पैसे मिळतील या भरवशावर दिला. परंतु काजू घेऊन ते दोघेही रातोरात पसार झाले. त्यानंतर त्या दोघांशी बागायतदारांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही. पंधरा ते वीस दिवसांनंतर आपली फसवणूक झाली हे बागायतदारांच्या लक्षात आले. त्यानंतर २० शेतकऱ्यांनी दोडामार्ग पोलीस स्थानकात त्या दोघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...