उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी कंपनी

शेतीमधील विषम परिस्थितीची दखल घेऊन उमरेड येथील काही महिला एकत्रित आल्या. त्यांनी एका शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना केली.
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी कंपनी
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी कंपनी

उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल घेऊन उमरेड येथील काही महिला एकत्रित आल्या. त्यांनी एका शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आर्थिक बळकटी, सक्षम व स्वयंसिद्ध शेतकरी होणे हा आहे. हे सगळे साध्य करण्यास नगदी पिकांचे उत्पादन, शेतमालावर प्रक्रिया, योग्य व्यवस्थापन, बाजारपेठ, खर्चाच्या दुप्पट भाव याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.  पुढील उद्दिष्ट ठेवून कार्य करण्याचे कंपनीच्या सिईओ वर्षाताई बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले. परिसरातील भूमीपुत्रांच्या सहकार्याने येत्या काळात उद्दिष्ट गाठून कंपनी लवकरच आपल्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करेल यात काही शंका नाही, असे कंपनीच्या अध्यक्षा रंजनाताई रेवतकर यांनी मत व्यक्त केले. निर्मलमाई शेतकरी उत्पादन कंपनीचे भागधारक, सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे.  इच्छुक भूमिपुत्रांनी निर्मलमाईचे सभासद बनून शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न बनविणाऱ्या ह्या चळवळीत सहभाग घेण्याचे आवाहन कंपनीच्या सचिव निलीमताई रेवतकर यांनी केले. कंपनीच्या स्थापनेस कृषी विभागाचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुमनताई इटनकर, गंगाधर रेवतकर, विदर्भ अग्रीकल्चर फेडरेशनचे सचिव अनिल नौकरकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गजानन झाडे, पणन महासंघाचे सदस्य विजय खवास आदी उपस्थित होते.  कळमनाचे सरपंच चंद्रशेखर तोडसे, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते. संचालन आस्था बेले यांनी केले. आभार हेमाताई पोटदुखे  यांनी मानले. पुढील बाबींवर देणार भर संघटित शेतकरी, शेतीचे व्यावसायिक स्वरूप, शेतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, मजुरीचा कमीत कमी खर्च, उच्च दर्जाच्या शेतमालाच्या उत्पादनास मार्गदर्शन, शेतीमालास योग्य बाजारपेठ व भाव, शेतमालावर आधारित गृहउद्योग, भिवापुरी मिरचीला गतवैभवाची प्राप्ती, उमरेडच्या सावजी मसाल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तेलवर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन, शेतीला वारंवार लागणारी खते, बी-बियाणे, कीटकनाशके इत्यादी रास्त दरात उपलब्ध करून देणे, तसेच ‘विकेल ते पिकेल’ हे तत्व प्रत्येक धुऱ्यावर राबविणे यावर विशेष भर देणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com