agriculture news in Marathi women farmer repairing agri pumps Maharashtra | Agrowon

कृषिपंप रिवाइंडिंग करणाऱ्या महिला शेतकरी मेकॅनिक 

माणिक रासवे
सोमवार, 8 मार्च 2021

जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील अल्पभूधारक कुटुंबातील जयश्री अंभोरे यांनी कृषिपंप रिवाइडिंग व्यवसायातील पुरुषाची मक्तेदारी मोडीत काढली आहे. 

हिंगोली ः जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील अल्पभूधारक कुटुंबातील जयश्री अंभोरे यांनी कृषिपंप रिवाइडिंग व्यवसायातील पुरुषाची मक्तेदारी मोडीत काढली आहे. पती गोविंद यांना त्या अनेक वर्षांपासून मॅकेनिक म्हणून साथ देत आहेत. त्यासोबतच घरच्या शेतातील कामेदेखील करतात. त्यामुळे दोन्ही व्यवसायांतील कामाचा उरक वाढला तसेच खर्चात बचत होत आहे. 

गोविंद अंभोरे हे मूळ सुकळी (ता. वसमत) येथील रहिवासी आहेत. गावाकडे त्यांची साडेतीन एकर हलक्या प्रकारची जमीन होती. जिरायती जमिनीतून फारसे उत्पन्न मिळायचे नाही. त्यामुळे गोविंद यांनी 1994 मध्ये आखाडा बाळापूर येथे भाड्याच्या जागेत सायकल टॅक्सी तसेच स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान थाटले. सुरुवातीची काही वर्षे त्यांचा हा व्यवसाय चांगला चालला. परंतु अलीकडील काही वर्षांत सायकल वापर कमी झाल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला. २००० मध्ये संधी तसेच शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी कृषिपंप रिवाइंडिंग, कुलर, घरातील पंखे दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला.

परिसरातील ३५ ते ४० गावांतील शेतकरी कृषिपंप दुरुस्तीसाठी घेऊन येऊ लागले. स्थानिक नागरिकही घरगुती उपकरणे दुरुस्तीसाठी आणू लागली. त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला तसेच व्यवसायातही चांगला जम बसला. सन २००३ मध्ये गोविंद यांचा विवाह मनुला (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील जयश्री यांच्याशी झाला. सुरुवातीची काही वर्षे जयश्री या गृहिणीच होत्या. 

परंतु २०१० पासून त्यांनी गोविंद यांना मोटार रिवाइंडिंग व्यवसायातील बारीकसारिक कामे करून मदत करू लागल्या. काही दिवसांमध्येच जयश्री यांनी कृषिपंप रिवाइंडिंगच्या कामातील कौशल्य शिकून घेतले आहे. आता त्या स्वतः कृषिपंप दुरुस्ती, कुलर दुरुस्ती, घरातील पंखे दुरुस्तीची कामे करतात. त्यामुळे गोविंद यांना अन्य कामे करण्यासाठी सवड मिळू लागली आहे. व्यवसायाचा विस्तार झाल्यामुळे अंभोरे यांना कामासाठी तीन मेकॅनिकची गरज आहे. परंतु जयश्री या मेकॅनिकचे काम करू लागल्यामुळे आता त्यांनी अन्य दोन मेकॅनिक कामासाठी लावलेले आहेत. 

घर आणि शेतीही सांभाळतात 
दरम्यानच्या काळात गावातील जमीन विकून अंभोरे यांनी चार किलोमीटरवरील कामठा शिवारात दोन एकर जमीन खरेदी केली आहे. खरिपात सोयाबीन, तर रब्बीमध्ये हरभरा ही पिके घेतात. पेरणी ते काढणी पर्यंतची सर्व कामे जयश्री करतात. सिंचन हंगाम सुरू झाल्यानंतर कृषिपंप बिघाडीचे प्रमाण वाढते. त्या वेळी जयश्री या घरची कामे आटोपून मॅकेनिकचे काम करतात. अंभोरे दांपत्याची मेकॅनिक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. दोघांची एकमेकांना साथ असल्यामुळे शेती तसेच व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी खर्च जाता चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते. शिलकीतून त्यांनी आखाडा बाळापूर येथे स्वतःची जागा खरेदी केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...