agriculture news in Marathi women has 14 percent land ownership Maharashtra | Agrowon

राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती’ मालकीण

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 मार्च 2020

दहाव्या कृषी गणनेत राज्यात पुरुष व महिला शेतकरी यांची एकूण सुमारे एक कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९ एवढी संख्या असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे सुमारे दोन कोटी पाच लाख ६ हजार ४३२ हेक्टर शेती आहे. त्यापैकी सुमारे १४ टक्के महिला खातेदार आहेत. यामध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत असली तरी पाच वर्षांनंतर होत असलेल्या कृषी गणनेतून यामध्ये खरे चित्र समोर येते.
— डॉ. जयंत टेकाळे, उपायुक्त, कृषी गणना, कृषी आयुक्तालय, पुणे

पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा वावर वाढत आहे. यात प्रामुख्याने कृषी क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. मात्र, त्यांना जमिनीवरील अधिकार आत्तापर्यंत कमी मिळत असे. शासनाने यासंदर्भात समान हक्काचा कायदा केल्यानंतर आणि केवळ महिलांकरिता शेतीविषयक योजना आणल्यानंतर महिलांच्या नावावर शेतजमीन करण्याचे प्रमाण वाढले. राज्यात सुमारे २३ लाख ६३ हजार ७०६ महिलांकडे तब्बल २८ लाख ८४ हजार ३२७ हेक्टर म्हणजेच सरासरी १४ टक्के शेतजमीन असल्याची बाब २०१५-१६ च्या दहाव्या कृषी गणनेतून समोर आली आहे. 

सध्या अनेक पुरुष शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असल्याने मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातून काही प्रमाणात शासनाला कर भरावा लागतो. याशिवाय शासनाच्या विविध योजनांचाही लाभ कमी प्रमाणात मिळतो. मागील काही वर्षांपासून शासनाने महिलांच्या नावावर शेती असल्यास अधिक लाभ देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महिलांच्या नावावर शेती करण्याचे प्रमाणही वाढले. दरवर्षी महिला शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

मागील २०१०-११ मध्ये झालेल्या नवव्या कृषी गणनेनुसार राज्यात पुरुष व महिला मिळून एकूण एक कोटी ३६ लाख ९८ हजार ९६५ खातेदार शेतकरी संख्या असून त्यांच्याकडे एकूण एक कोटी ९७ लाख ६७ हजार ६१ हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी महिला खातेदारांची संख्या २० लाख ५२ हजार ५१९ एवढी होती. तर त्यांच्याकडे एकूण २५ लाख ८५ हजार २५३ हेक्टर क्षेत्र होते. त्या तुलनेत नवीन २०१५-१६ च्या दहाव्या कृषी गणनेत महिला खातेदारांच्या संख्येत १४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.    

जमीनधारणा क्षेत्रात घट 
कृषी गणना दर पाच वर्षांनी केली जाते. त्यानुसार वैयक्तिक जमिनी धारणा क्षेत्रात मागील ४५ वर्षाचा लेखाजोखा पाहता ४.२८ हेक्टरवरून घसरण होऊन ती १.३४ हेक्टरपर्यंत खाली आल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने १९९५ नंतर जमिनी धारण क्षेत्रात झपाट्याने घट झाली आहे.  

जिल्हानिहाय महिला शेतकरी संख्या व क्षेत्र (कंसात क्षेत्र हेक्टरमध्ये) ः
ठाणे १९,०९४ (२२,७८७), रायगड ६९,९६८ (५९५१७), रत्नागिरी ८०,११४ (८९१९२), सिंधुदुर्ग ७४,४७५ (६३,८०१), नाशिक १,११,३३८ (१,४७,१८४), धुळे ४४,१६६ (७२,०४३), नंदुरबार २७,३२८ (४७,१३८), जळगाव ७९,८२२ (१,१६,१०७), नगर १,७५,८३० (१,८१,६८८), पुणे १,६५,७६४ (१,९१,७३२), सोलापूर ८४,१९३ (१,३०,७१३), सातारा ८०,२९२ (६२,३३७), सांगली ६२,०४२ (६९,५११), कोल्हापूर ८२,७९१ (५४,३६०), औरंगाबाद १,०८,७८७ (१,२४,८०४), जालना ६८,२०७ (८२,७०३), बीड १,१३,६२७ (१,०६,९०१), लातूर ६६,७६९ (८६,३९६), उस्मानाबाद ५६,३५१ (८६,९३८), नांदेड १,१२,६४८ (१,३७,५९९), परभणी ६४,७८७ (८७,१७४), हिंगोली ४३,१४५ (५२,८७६), बुलडाणा ८८,९२० (१,१३,४८५), अकोला ५५,०३२ (७९,५४३), वाशीम ४०,७२४ (५८,९६३), अमरावती ७०,६१० (१,०८,९७९), यवतमाळ ७४,०१७ (१,४५,०४०), वर्धा ३०,१७७ (५८,३५४), नागपूर ३६,३१३ (५९,२०४), भंडारा ३९,६३२ (३१,७५६), गोंदिया ४६,१९४ (३३,१८९), चंद्रपूर ४३,५१० (६५,०७९), गडचिरोली १९,३०४ (२६,९९०), पालघर २७,७३५ (४०,२४४).

प्रकारानुसार महिला खातेदार शेतकऱ्यांची संख्या    

प्रकार   क्षेत्र महिला शेतकरी संख्या
अत्यल्प १ हेक्टर  १२,७५,३९५
अल्प १ ते २ हेक्टर ६,७९,६०७
निम्न मध्यम २ ते ४ हेक्टर    ३,१९,४५६
मध्यम ४ ते १० हेक्टर ८२,२९०
मोठे १० हेक्टरपेक्षा अधिक ६,९५८

प्रतिक्रिया
आम्ही दोघी जावा मिळून २९ एकर शेती सांभाळतो. माझ्या नावावर १४ एकर शेती आहे. यात खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, ज्वारी तर रब्बीत हरभरा घेते. मी ट्रॅक्टर चालविण्यापासून तर निंदण, कापूस वेचणी, मूग, उडदाच्या शेंगा तोडणे, मजुरांकडून काम करून घेणे, बँकेचे व्यवहार, कृषी निविष्ठांची खरेदी अशी सर्वच कामे करते. माझे पती व दीर, दोघांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने शेतीची जबाबदारी आम्ही दोघी सांभाळतो. 
— ज्योती संतोष देशमुख, शेतकरी, कट्यार, ता. जि. अकोला.

 


इतर महिला
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...
‘त्या’ पस्तीस जणींचा ‘ते’ बनलेत आधारकोल्हापूर : ‘त्या’ पस्तीस जणींचा ''ते'' गेल्या...
महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती, पूरक...नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या...
आहारातील अंड्याचे महत्त्व..मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा...
बहुगुणी नारळपूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण...
रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीकोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील...
बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी...
..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजेदुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत...
आरोग्यदायी आले, सुंठ पावडरमहिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या...
आरोग्यदायी शेवगा पावडरलहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात...
महिला गटांमुळे मिळाली प्रगतीची दिशानांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्गराज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...