Agriculture news in Marathi Women Savings Group in Washim District on Digital Turn | Agrowon

वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल वळणावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारा जिल्ह्यातील महिला बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० ॲनिमेटर यांना मंगळवारी (ता. १८) स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.

वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारा जिल्ह्यातील महिला बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० ॲनिमेटर यांना मंगळवारी (ता. १८) स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.

बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून नाबार्ड प्रयत्न करीत आहे. बचत गटांचे सर्व व्यवहार ऑनलाईन व अपडेट करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वाशीम जिल्हा कार्यालयात ॲनिमेटर यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ‘नाबार्ड’चे सहायक महाप्रबंधक विजय खंडरे व ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्या हस्ते ६० ॲनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात सुरुवातीला ६ तालुक्यांतील दोन हजार बचत गटांचे डिजिटलायझेशन ‘ई-शक्ती’ कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे बचत गटांचे व्यवहार पारदर्शी होऊन प्रत्येक सदस्याला एसएमएसद्वारे गटाच्या आर्थिक व्यवहाराची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच बचत गटांना बँकेकडून कर्ज सुविधा मिळण्यास सोयीस्कर होणार आहे, अशी श्री. खंडरे यांनी या वेळी दिली.
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...