agriculture news in Marathi women self help group make 20 lac masks Maharashtra | Agrowon

राज्यात बचतगटाच्या महिलांकडून वीस लाख मास्कची निर्मिती 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

मास्क तयार करण्यात लातूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. लॉकडाऊनच्या काळात बचतगटांच्या जास्ती जास्त महिलांना काम मिळावे म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात लातूर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक साडे तीन लाख मास्क तयार केले आहेत. या मास्कला मागणी असून आशा वर्कर, आंगणवाडी ताई, आरोग्य कर्चमाऱ्यांनाही दिले आहेत. त्याचा चांगला उपयोग होत आहे. 
- संतोष जोशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 

लातूरः कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना करीत राज्यातील बचतगटाच्या महिला या आपत्तीचे सोनं करु पाहत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी लागणाऱ्या मास्कची गरज लक्षात घेवून ते तयार करण्याचे शिवधनुष्य या महिलांनी उचलले आहे. पहिल्या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सुमारे तीन हजार बचतगटाच्या महिलांनी वीस लाख ४१ हजार मास्क तयार करून विकले आहेत. यातून दोन कोटी ३६ लाख रुपयांचा व्यवहार केला आहे. यातून साडे दहा हजार महिलांना घरात बसून रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांचे हे मोठे यश आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधवा असे आवाहन केले जात आहे. यातून मास्कची मोठी मागणी वाढत आहे. लोकांची गरज लक्षात घेवून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचतगटाना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यातून राज्यातील दोन हजार ९६५ बचतगट पुढे आले असून त्यांनी मास्क तयार करण्याचे काम सुरु केले आहे. या कामातून घरात बसून राज्यातील दहा हजार ६६० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हे आपत्तीच्या काळातील सर्वात मोठे यश आहे. 

या सर्व बचतगटांनी आतापर्यंत वीस लाख ४१ हजार ९६० मास्क तयार केले आहेत. या मास्कच्या विक्रीतून या बचतगटांनी दोन कोटी ३६ लाख ८२ हजार ४३१ रुपयांचा व्यवहार केला आहे. सरासरी दहा ते पंधरा रुपयांना या मास्कची विक्री करण्यात आली आहे. 
 

प्रतिक्रिया
निलंगा तालुक्यातील पंधरा वीस गावातील बचतगट मास्क तयार करण्याचे काम करीत आहेत. कर्नाटकमधूनही आमच्या मास्कला मागणी आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या बचतगटाकडून ६५ हजार मास्क कर्नाटकात गेले आहेत. मुंबईहूनही मागणी आहे. घरात बसून महिलांना हा रोजगार उपलब्ध झाला आहे. 
- भाग्यश्री मुगळे, सदस्य, शिवपार्वती महिला बचतगट, हलगरा, ता. निलंगा 
 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...