agriculture news in marathi The women's group makes 30 types of spices | Agrowon

महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसाले

शामराव गावडे
रविवार, 27 सप्टेंबर 2020

इटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला सौ. सुजाता गजवंत पवार यांनी चैतन्य दीप महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून मसाला निर्मिती उद्योगाला चालना दिली.

इटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला सौ. सुजाता गजवंत पवार यांनी चैतन्य दीप महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून मसाला निर्मिती उद्योगाला चालना दिली. गेल्या चार वर्षात गुणवत्तेमुळे बाजारपेठेत त्यांच्या मसाल्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर इटकरे गाव लागते. या गावातील सौ.सुजाता गजवंत पवार यांनी दहा महिलांना एकत्र करून बचत गटास सुरूवात केली. दर महिन्याला बचतीसाठी मासिक वर्गणी जमा करणे हा पहिल्यांदा मर्यादित उद्देश होता. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चैतन्य दीप महिला स्वयंसहाय्यता समुहाची शासकीय नोंदणी केली. पवार कुटुंबियांकडे शेती क्षेत्र कमी असल्याने म्हैसपालन सुरू केले. जातिवंत दुधाळ म्हशीचे संगोपन आणि विक्रीतून त्यांनी पंचक्रोशीत वेगळी ओळख तयार केली. दरवर्षी किमान तीन ते चार दुधाळ म्हशींच्या विक्री होत होती. दूध उत्पादन आणि म्हैस विक्रीतून आर्थिक उत्पन्नही चांगले मिळायचे. परंतु मजूर टंचाई आणि पशुखाद्याचे दर वाढल्याने दुग्ध व्यवसाय कमी केला. सध्या घरापुरत्या दोन म्हशींचे संगोपन केले जाते. 

मिळवली हक्काची बाजारपेठ
मसाले तयार झाले, परंतु मार्केटमध्ये विक्री करताना महिला गटाची मोठी कसोटी लागली. पंचक्रोशीतील काही विक्रेते आमच्याकडे इतर मसाले आहेत, त्यामुळे तुम्ही मसाला सॅम्पल ठेवा, असे सांगायचे. त्यामुळे सुजाताताईंना पंचक्रोशीतील दुकानदारांना सुरवातीला साडेचार हजार रुपयांचा मसाला केवळ सॅंपलसाठी द्यावा लागला. त्यामुळे पहिल्या टप्यात उत्पन्नाची शाश्वती नव्हती. परंतू हळूहळू ग्राहक, दुकानदार मसाल्याची मागणी करू लागले आणि उद्योगाला गती मिळाली.बाजारपेठेत गटाच्या मसाल्याची वेगळी ओळख तयार होण्यासाठी सुजाताताईंनी ‘जान्हवी मसाले‘ हा ब्रॅण्ड तयार केला. त्यांची सरकारी पातळीवर नोंदणी देखील केली. त्यामुळे बाजारपेठेत गटाच्या मसाल्यांना नवी ओळख मिळाली. विक्रेत्यांची मागणी वाढू लागल्याने गटाचा आत्मविश्वास दुणावला. हळूहळू  मसाला उत्पादनांना स्वतःची बाजारपेठ तयार झाली. यासाठी पहिल्यांदा प्रचंड कष्ट गटाला करावे लागले. बचत गटाला उमेद अभियानाचे  व्यवस्थापक आशुतोष यमगर, समन्वयक विजय पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले आहे.

तीस प्रकारचे मसाले 
गटातील महिला पनीर, गरम, चिकन, मटण,बिर्याणी, कुर्मा, अंडा करी, मालवणी मसाला, तांबडा रस्सा,फिश, चिली पावडर,पाव भाजी, सब्जी,चिकन ६५, छोले मसाला, धना पावडरसह तीस प्रकारचे मसाले तयार करतात.पहिल्या टप्यात प्लॅस्टिक पाऊचमध्ये मसाले पॅकिंग केले जात होते. परंतु बाजारपेठेत उत्पादनांचा वेगळेपणा जपण्यासाठी गटाने मसाल्याची बॉक्स पॅकिंगमध्ये विक्री सुरू केली.आतून चंदेरी रंगाचे पॅकिंग आणि वरून बॉक्स पेटी असे स्वरूप आहे. दहा,बारा,पंधरा आणि तीस ग्रॅममध्ये मसाल्याचे पॅकिंग केले जाते. सरासरी प्रति किलो ६५० रूपये असा दर आहे. दख्खन जत्रेमध्ये मसाला उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभर मसाल्याची ओळख तयार होण्यास मदत झाली. याचबरोबरीने परिसरातील बचत गटांनादेखील सुजाताताई प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करतात. बचत गटाची मसाला उद्योगातील प्रगती लक्षात घेऊन सुजाता पवार यांना बचत गटांच्या वतीने देण्यात येणारा ‘जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार' जाहीर झाला आहे. 

गुणवत्ता आणि सचोटीने व्यवहार 

  • मसाला गुणवत्तेमध्ये तडजोड न करता व्यवसायाची वाटचाल.
  • स्वतःच्या कष्टाने वाढविली बाजारपेठ.
  • मसाला उद्योगासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेऊन वेळेवर परत फेड.
  • गावातील सहा महिलांना वर्षभर हक्काचा रोजगार.
  • तीन तालुक्यात १०० गावांमध्ये विक्रीचे जाळे.

जोडले १६०० दुकानदार 
सध्या पंचक्रोशीतील काही विक्रेते जागेवर येऊन विविध प्रकारचा मसाला खरेदी करतात.तर काही छोट्या विक्रेत्यांना जागेवर जाऊन मसाले पोहोच करावे लागतात. विविध गावांच्यामध्ये मसाला बॉक्स पोहोचविण्यासाठी गाडी खरेदी केली आहे. पती गजवंत आणि मुलगा उमेश यांची मसाला वाहतूक आणि विक्रीसाठी चांगली मदत होते. सध्या वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील सुमारे १०० गावांतील १६०० दुकानांमध्ये मसाला विक्रीसाठी पाठविला जातो. दरमहा एक लाखाच्या उलाढालीतून ३० टक्के नफा मिळतो, असे सुजाताताई सांगतात. 

मसाला निर्मिती उद्योगाला सुरूवात 

  • सुजाताताई  पहिल्यापासून घरगुती स्तरावर मसाला निर्मिती करत होत्या. बचत गटातील महिलांची साथ मिळाल्यामुळे त्यांनी मसाला निर्मिती उद्योगाला गती दिली. मसाला निर्मितीसाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सात हजाराचे भांडवली कर्ज घेतले. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या टप्यात चार प्रकारचे मसाला बनविण्यास सुरवात केली.   मिक्सरवर मसाले बारीक करून लहान प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून गाव परिसरातील ग्राहक तसेच दुकानदारांना त्यांनी मसाला देण्यास सुरूवात केली. मसाल्याची वेगळी चव आणि योग्य दर्जा यामुळे ग्राहकांच्याकडून मागणीत वाढ होऊ लागली.    
  • मसाल्याच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन सुजाताताईंनी मसाला उत्पादनात वाढ तसेच पॅकिंगसाठी बचत गटातील महिलांना सोबत घेतले.  विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती सुरू झाली. यावेळी मसाला विक्रीतून टप्याटप्याने नफा मिळणार होता. पहिल्यांदा कच्चा माल खरेदी करण्यासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागणार होती. गटातील महिलांना पहिल्या टप्यात आर्थिक गुंतवणूक करणे शक्य नव्हते. त्यामुळे सुजाताताईंनी या महिलांना दररोजच्या मसाला निर्मिती कामाचे मानधन देण्यास सुरूवात केली. कच्चा माल खरेदीसाठी सुजाताताईंनी स्वतः आर्थिक गुंतवणूक केली. बचत गटातील महिला रिकामे बॉक्स तयार करणे,त्यामध्ये वजनानुसार मसाला पॅकिंगचे काम करू लागल्या. मसाला निर्मिती करताना पहिल्यापासून स्वच्छता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले. या उद्योगातून गावातील सहा महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

संपर्क- सौ. सुजाता पवार, ९६३७२९१२२२


फोटो गॅलरी

इतर महिला
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठासीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
परसबागेतून मिळतो पोषण आहारभंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या जवळील...