महिला गटाचा प्रकल्प इतरांसाठी प्रेरणादायी ः जिल्हाधिकारी डॉ. डांगे

महिला गटाचा प्रकल्प इतरांसाठी प्रेरणादायी ः जिल्हाधिकारी डॉ. डांगे
महिला गटाचा प्रकल्प इतरांसाठी प्रेरणादायी ः जिल्हाधिकारी डॉ. डांगे

बुलडाणा : जिल्ह्यातील महिला सक्षम करण्यासाठी हतेडी येथील महिला गटाचा प्रकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. जिल्ह्यात महिलांनी अशा पद्धतीने गट शेतीच्या माध्यमातून प्रकल्प घ्यावेत. त्याला प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले.

राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनी हतेडी येथील महिलांच्या राजमाता जिजाऊ सहकारी संस्थेच्या व कृषी विभागाच्या गट शेती योजनेच्या माध्यमातून उभ्या राहत असलेल्या प्रकल्पांना जिल्हाधिकारी डॉ. डांगे यांनी भेट दिली. तसेच हतेडी येथे भेटीदरम्यान राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यासोबतच त्यांनी पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग शेतकरी गटाच्या (खंडाळा मकरध्वज, ता. चिखली) मसाला आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगासही भेट दिली. दोन्ही प्रकल्पांची पाहणी करून प्रकल्पातील कामाचा आढावा घेतला.

हतेडी येथे संस्थेचे संचालक प्रकाश सुरडकर यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई सुरडकर, उपाध्यक्षा शकुंतलाबाई पाटील व सचिव अलकाताई जाधव तसेच संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.  त्याचप्रमाणे खंडाळा मकरध्वज येथे गटाचे अध्यक्ष सचिन देशमुख, सचिव दिलीप पाटील व सभासद उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com