मास्क निर्मितीतून महिला गटांनी कमविले १६ लाख 

यवतमाळ ः कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्यात येत आहेत. हे मास्क निर्माण करण्यासाठी ग्रामीण जीवन्नोनती अभियाना (उमेद) च्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गंत यवतमाळमध्ये सर्वाधिक पाच लाख १५ हजार ७७५ मास्कची निर्मिती करण्यात आली आहे.
Women's groups earned Rs 16 lakh from mask production
Women's groups earned Rs 16 lakh from mask production

यवतमाळ ः कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्यात येत आहेत. हे मास्क निर्माण करण्यासाठी ग्रामीण जीवन्नोनती अभियाना (उमेद) च्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गंत यवतमाळमध्ये सर्वाधिक पाच लाख १५ हजार ७७५ मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील १६ तालुक्‍यातील १४२२ उमेदच्या महिला बचतगटांनी मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जिल्ह्यातून २४६६ महिला पुढे आल्या. या महिलांनी ५ लाख १५ हजार ७७५ मास्कची निर्मिती करून एक उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे या संकटाच्या काळात ना नफा ना तोटा या संकल्पनेतून मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. 

गावातील नागरिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व गरजूंना ५७४०३ मास्क निःशुल्क वाटण्यात आले. जिल्हयातील ग्रामपंचायततींना ना नफा ना तोटा तत्वावर ३ लाख ४० हजार ६४८ मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. या माध्यमातून बचतगटांना १६ लाख ६५ हजार ३६९ रुपयांची मिळकत झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त मास्कची निर्मिती यवतमाळ तालुक्‍यात झाली असून या ठिकाणी ८२ गटांच्या १८० महिलांनी ५८३५० मास्कची निर्मिती केली आहे. पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकरी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक राजेश कुळकर्णी यांनी गटांना याकामी प्रोत्साहन दिले. 

तालुकानिहाय्य मास्क निर्मिती
यवतमाळ ५८३५०
उमरखेड ५४४००
घाटंजी ५१६००
वणी ३५४०४
केळापूर ३४१६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com