कुटुंबाच्या पोषण आहारासाठी झटते आहे ‘महिलांची विंग’

आहारात पोषक अन्नद्रव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण. हे पटल्याने जवळपास ६५ कुटुंबातील महिलांनी परसबागेची निर्मिती सलग तिसऱ्या वर्षी सातत्याने करून आपल्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी उचलली आहे.
कुटुंबाच्या पोषण आहारासाठी झटते आहे ‘महिलांची विंग’
कुटुंबाच्या पोषण आहारासाठी झटते आहे ‘महिलांची विंग’

जालना : आहारात पोषक अन्नद्रव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण. हे अन्नद्रव्य अगदी सहज परसबागेत पोषण बाग उभी करून मिळवले जाऊ शकतात. हे पटल्याने जवळपास ६५ कुटुंबातील महिलांनी परसबागेची निर्मिती सलग तिसऱ्या वर्षी सातत्याने करून आपल्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी उचलली आहे. काही महिलांनी आपल्या कुटुंबाची गरज भागवून उरलेला भाजीपाला थेट विक्री करत कुटुंबाच्या अर्थकारणाला ही हातभार लावण्याचे काम केले आहे. मागील २ वर्षांपासून पोषण बागनिर्मिती प्रात्याक्षिके कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या गावामध्ये राबविली आहेत. कचरेवाडी, हडप सावरगाव व वानडगाव येथील जवळपास २०० कुटुंबासाठी राबविली गेली. पोषण बागनिर्मितीत प्रत्यक्षरीत्या महिलांचाच सहभाग असतो. परंतु सुरुवातीला इतर शेती कामाच्या व्यापामुळे व कुटुंबाकडून नकार मिळाल्यामुळे या कामास त्या महत्त्व दिले जात नव्हते. परंतु खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने व प्रशिक्षण कार्यक्रमातून महिलांना पोषण बागेचे महत्त्व पटवून दिले गेले.  शेतकरी जगाचा पोशिंदा असून, त्यालाच भाजीपाला खरेदी का करावा लागावा असा प्रश्‍न त्यांच्या समोर मांडला गेला. त्यानंतर महिला पोषण बागेचे महत्त्व उमगल्याने पुढे आल्या. त्यांनी आपल्या शेतावर अर्धा गुंठा क्षेत्रात फळांची रोपे पेरू, आंबा, सीताफळ, पपई, जांभूळ  कढीपता, शेवगा, लिंबोनी व भाजीपाला मध्ये पालेभाजी, फळभाजी, शेंगवर्गीय, कंदभाजी इतर भाज्या अशा दैनंदिन आहारात समाविष्ट भाज्या व फळे लागवड केली, तेव्हा त्यांना त्याचे महत्त्व पटले. विशेष म्हणजे त्यांची भाजी ही नेमकी लॉकडाउन काळात त्यांना खाण्यास मिळाली व सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांचा समावेश त्यांच्या रोजच्या आहारात होऊ लागला. याशिवाय जास्तीचा भाजीपाला त्यांनी गावपातळीवर विक्री करून स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावला.  सहभागी कुटुंबाच्या आठवड्याला भाजी फळासाठी होणाऱ्या खर्चाची बचत झाली. भाज्या खाल्यामुळे कुटुंबाचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले व दवखाण्याचा खर्च देखील वाचला. सुरुवातीला केव्हीकेने त्यांना बियाणे पुरवठा केला होता. आता मात्र त्यापैकी जवळपास ६५ कुटुंबानी  स्वत: अनुभव घेलत्यामुळे पोषण बाग बियाणे किट खरेदी करून भाजीपाला लागवड केली आहे. हा फार मोठा बदल दिसून आला व भविष्यात देखील हे चालू ठेवणार असे त्यांनी सांगितले. यातील ५ ते ६ कुटुंब केव्हीके व इतर ठिकाणी आपला भाजीपाला विक्री करत आहेत. या महिलांचा उपक्रम पाहून इतर जनतेमध्ये देखील पोषण बागेचे महत्त्व पटले आहे. ते देखील आपल्या शेतात कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला लागवड करत आहेत. लॉकडाउनमुळे सर्वांनाच अडचणी आल्या, परंतु त्यातूनही या महिलांनी आपली जिद्द व चिकाटी दाखवून हे पाऊल टाकले आहे. किटची मागणी वाढली आधी दिलेल्या प्रत्यक्षिकानंतर खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने ५०० पोषण बाग बियाणे किट तयार केल्या. या किटमध्ये एकूण २३ प्रकारच्या भाज्यांची बियाणे समाविष्ट केले. आतापर्यंत ३५० बियाणे किट जालण्यासह पुणे, अमरावती, नाशिक, बुलडाणा येथे विक्री केली गेली आहे. एका कुटुंबाला पुरेसे बियाणे पाकीट यामध्ये असल्यामुळे या कीटची मागणी ग्रामीण भागातूनच नाही तर शहरी भागातील वाढली असल्याचे कृषी विज्ञान केंद्र खरपुडीच्या गृह विज्ञान तज्ज्ञ संगीता कराळे गायकवाड व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com