Agriculture news in Marathi The work of ‘MahaDBT’ is online | Agrowon

‘महाडीबीटी’चे काम ऑनलाइनच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021

शेतकऱ्यांकडून पुन्हा ऑफलाइन कागदपत्रांची मागणी करू नका, अन्यथा अशा अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा देणारा आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जारी केला आहे. 

पुणे ः महाडीबीटी संकेतस्थळावरील कामकाज पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच करणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पुन्हा ऑफलाइन कागदपत्रांची मागणी करू नका, अन्यथा अशा अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा देणारा आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जारी केला आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचे लाभ ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. मात्र त्यामुळे एरवी फाइल तयार करणे, ती पुढे पाठवणे किंवा मंजूर करणे अशा माध्यमातून वर्षानुवर्षे मलिदा लाटण्यात पटाईत झालेल्या कृषी अधिकाऱ्यांना अडचणी आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांकडून अकारण कागदपत्रांची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकार ‘अॅग्रोवन’ने उघडकीस आणताच कृषी आयुक्तांनी आता थेट प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे. आयुक्तांच्या या ठाम भूमिकेचे आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकारी आणि कृषी उद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे. 

आयुक्तांच्या काय निदर्शनास आले 
आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी करीत ऑफलाइन कागदपत्रांची स्वीकारणी तत्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘‘महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करताना किंवा पूर्वसंमतीनंतर शेतकऱ्याला सातबारा, आठ अ, बॅंक खातेपुस्तिकाची प्रत, १०० रुपयांचे बंधपत्र, दरपत्रक, संमतिपत्र, पॅन कार्डची झेरॉक्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, देयके याच्या हार्डकॉपीज (कागदपत्रांच्या प्रति) शेतकऱ्यांकडे मागितल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कोणत्याही कागदपत्रांच्या प्रति शेतकऱ्यांकडून घेऊ नका,’’ असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

‘‘महाडीबीटी संकेतस्थळावरून संगणकीय सोडत निघाल्यानंतर राज्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांची विविध योजनांच्या लाभांसाठी निवड केली जाते. शेतकऱ्यांनी नेमकी कोणती अत्यावश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर पाठवायची (अपलोड) आहेत, याचा लघू संदेश (एसएमएस) थेट शेतकऱ्यांना पाठविला जातो. त्यानुसार ऑनलाइन कागदपत्रे न पाठविणाऱ्या शेतकऱ्यांची निवड रद्द होते.त्यामुळे लघू संदेशाव्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे मागू नयेत,’’ असे आयुक्तांनी बजावले आहे. 

‘महाडीबीटी फार्मर’ अॅप उपलब्ध
कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भ्रमणध्वनीवर ‘महाडीबीटी फार्मर’नावाने एक उपयोजन (अॅप्लिकेशन) उपलब्ध करून दिलेले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना पूर्वसंमतीनंतर अत्यावश्यक कागदपत्रे (देयके, छायाचित्रे, कागदपत्रांच्या प्रति) छायांकित करून ती थेट पाठवण्याची (अपलोडिंग) सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच सर्व कागदपत्रे महाडीबीटी संकेतस्थळ आपोआप जनन होत आहेत. त्यामुळे पुन्हा त्यामुळे मुळ कागदपत्रे कोणत्याही सार्वजनिक सुविधा किंवा सेतू केंद्राकडे अथवा कृषी विभागाकडे सादर करण्याची आवश्यकता राहिलेलीच नाही,’’ असेही आयुक्तांनी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेले आहे.

आयुक्तांनी काय आदेश दिले

  • कागदपत्रांच्या प्रति क्षेत्रीय स्तरावर कोणत्याही उपविभागाने, तालुका किंवा मंडळ स्तरावर गोळा करू नये
  • अशी मूळ कागदपत्रे गोळा करून आपापल्या कार्यालयांमध्ये जतनदेखील करू नये
  • ऑफलाइन कागदपत्रे गोळा केल्यास त्याचा खर्च मिळणार नाही व कारवाईदेखील होईल.

इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...